ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 16 - महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय प्रकारातील कर्णधारपद सोडल्यानंतर कसोटी आणि टी-२० प्रकारांप्रमाणे ही जबाबदारी देखील विराट कोहलीकडे सोपविण्यात आली. मात्र, पहिल्या सामन्यावेळी धोनीला याचा विसर पडल्याचे दिसून आले. पुण्यातील गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रिव्ह्यूचा निर्णय कर्णधार विराट कोहलीच्या अगोदर घेऊन हेच सिद्ध केले.
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. इंग्लंड फलंदाजी करत असताना 27 व्या षटकात इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन खेळत होता. त्यावेळी हार्दिक पांड्याने टाकलेला एक चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन गेला. हा झेल आहे आणि मॉर्गन बाद झाला आहे या बद्दल धोनीला आत्मविश्वास होता. त्याने पंचाकडे पाहिले. परंतु पंचाने मॉर्गन बाद झाल्याचा निर्णय दिला नाही. तेव्हा तात्काळ धोनीने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.
विक्रमांच्या बरसातीने विराटपर्वाची सुरुवात
झंझावाती शतकासह केदार दिग्गज फलंदाजांच्या यादीत
विराटची कमाल, केदारची धमाल! पहिल्या वनडेत भारताची बाजी
धोनीच्या या निर्णयावर कर्णधार विराट कोहलीने पुढच्याच दुजोरा दिला. जेव्हा धोनी आणि विराट एकमेकांजवळ आले तेव्हा विराटने धोनीकडे पाहिले तो धोनीला या विकेटबद्दल आत्मविश्वास असल्याचे त्याच्या लक्षात आले. रिव्ह्यूमध्ये २६ चेंडूमध्ये २८ धावा करणाऱ्या मॉर्गनला बाद घोषित करण्यात आले.
भारताने पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर तीन विकेटने थरारक विजय नोंदविला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेतही भारताने १-0 अशी आघाडी घेतली आहे.