इटली : भारताची अव्वल धावपटू द्युती चंदनं बुधवारी इतिहास घडवला. तिने इटली येथे सुरू असलेल्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 100 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक नावावर केले. द्युतीनं 11.32 सेकंदाच्या वेळेसह ही विक्रमी कामगिरी केली. यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. शिवाय या जागतिक स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 100 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीतही पात्रता मिळवता आली नव्हती.
या विजयानंतर द्युती म्हणाली,''जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय असल्याचा मान मिळाल्याचा आनंद होत आहे. हे पदक मी KIITचे संस्थापक प्रोफेसर समंताजी, ओडिशाचे लोकं आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना समर्पित करते. या सर्वांनी मला भरपूर पाठिंबा दिला.''
या स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या अँजला डेल पोंटेनं 11.33 सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक जिंकले. द्युतीनं उपांत्य फेरीत 11.41 सेकंदाची वेळ नोंदवली होती.
पाहा व्हिडीओ...
द्युती चंदने शनिवारी समलैंगिक असल्याचे जाहीर केले होते. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रीणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका सांगितले. मात्र, तिने मैत्रीणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची द्युतीची भावना आहे. पण आता तर तिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच सार्वजनिकरित्या समलैंगिक असल्याचा दावा केला आहे. ती म्हणाली की, " सध्या माझी ओळख फार वेगळी झाली आहे. पण माझे एका मुलाबरोबर पाच वर्षे अफेअर होते. ही गोष्ट आहे २००९ सालची. तेव्हा मी आठवीमध्ये होती. त्यावेळी मला एका मुलाने प्रपोज केले होते. त्यानंतर आम्ही पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. पण पाच वर्षांनंतर आमचे ब्रेकअप झाले."
ती म्हणाली,''मला समजून घेणारा जीवनसाथी मिळाला आहे. आपल्याला कोणासोबत आयुष्य घालवायचे आहे, याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळायला हवं. समलैंगिक असलेल्यांना मी नेहमी पाठींबा दिला आहे आणि ही वैयक्तीक निवड आहे. सर्वोच्च न्यायलयानेही 377 कलमाबद्दल दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मला हे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. खेळाडू म्हणून माझ्या कामगिरीवर शंका उपस्थिक करण्याचा कोणालाही अधिकार नाही. समलैंगिक संबंध ठेवणे हा माझा वैयक्तीक निर्णय आहे आणि त्याचा आदर करायला हवा. भारतासाठी मी पदक जिंकत राहीन.''