खेळ म्हटलं की हार-जीत आलीच... पण, जय-पराजयापलीकडेही खेळात एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे जिद्द... इतरांसोबत स्पर्धा करण्यासाठी जिद्दच महत्त्वाची असते. आज कोरोना व्हायरसच्या संकटात अनेक जण मानसिकदृष्ट्या खचले असतील, अनेकांना घरी बसून कंटाळा आला असेल आणि त्यामुळे त्यांची चिडचिड होणंही साहजिक आहे. संकटात न खचता त्याचा सामना करण्याची प्रेरणा देणारी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. पण, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला तोड नाही.
एक पाय गमावलेल्या मुलीचा हा व्हिडीओ आहे आणि तिच्या जिद्दीला मिळालेली दाद, आपल्याला विचार करण्यास नक्की भाग पाडते. या व्हिडीओत लहान मुलींमध्ये धावण्याची शर्यत रंगलेली पाहायला मिळत आहे. या सर्व धडधाकट मुलींना आव्हान देण्यासाठी ती दिव्यांग मुलगी शर्यतीत सहभागी झाली. त्यामुळे शर्यतीचा निकाल काय लागला, कोण जिंकलं, याला फार महत्त्व उरलेच नव्हते. त्या दिव्यांग मुलीला धावताना पाहूऩ उपस्थित प्रेक्षकही उभे राहून टाळ्या वाजवू लागले. त्या मुलीनं फिनीश लाईन पूर्ण करताच टाळ्यांचा कडकडाट झाला...
पाहा व्हिडीओ...
IPL 2020 रद्द करणं बीसीसीआयला परवडलं नसतं, जाणून घ्या का ?
'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का!
IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना
Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!