ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 15 - 'जंटलमन्स गेम' अशी ओळख असलेल्या क्रिकेटमध्ये वादावादीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये एका स्थानिक सामन्यादरम्यान तर मोठा राडा पाहायला मिळाला.
या सामन्यात एका फलंदाजाने विकेट घेतल्याचा आनंद व्यक्त करत असलेल्या गोलंदाजाला खांद्याने धक्का देऊन खेळपट्टीवर पाडलं. विशेष म्हणजे क्रिकेटचे नियम बनविणा-या मेरिलिबॉन क्रिकेट क्लबने अलीकडेच मैदानावर असभ्य वर्तनाबद्दलचे नवे नियम घोषित केले आहेत.
येथील स्थानिक सामन्यात एका वेगवान गोलंदाजाने फलंदाजाला त्रिफळाचीत केलं. त्यानंतर विकेट घेतल्याचा आनंद व्यक्त करत तो फलंदाजाकडे टाळ्या वाजवत आला पण फलंदाजाला ते अजिबात आवडलं नाही. त्याने रागाच्या भरात
गोलंदाजाला खांद्याचा धक्का देऊन थेट खेळपट्टीवर पाडलं. त्यावर एक क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या दिशेने धावत आला आणि त्याला धक्का देऊन खाली पाडलं. त्यानंतर अन्य अन्य क्षेत्ररक्षकांनीही या राड्यात उडी घेतली. गोलंदाजाला चार आठवड्याच्या निलंबनाची शिक्षा झाली असून, फलंदाज आणि धक्का देणा-या क्षेत्ररक्षकाला पुढील वर्षीच्या जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.