ऑनलाइन लोकमत
रियो, दि. १० : रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या दिवशी झालेल्या सामन्यात भारताच्या २४ वर्षीय विकास कृष्णनने अमेरिकेच्या चार्ल्स कॉनवेलचा पराभव करत विजयी 'पंच' मारला आहे. ७५ किलोच्या बॉक्सिगच्या राऊंड ३२ सामन्यात त्याने १८ वर्षीय कॉनवेलचा पराभव केला. पहिल्या मिनिटापासून त्याने आपल्या अनुभवचा परिपुर्ण फायदा घेत आघाडी मिळवली.
संपुर्ण सामन्यात त्याचा पंच कॉनवेलवर भारी पडला. पहिल्या फेरीत मिळालेली ३ गुणांची आघाडी कायम राखत त्याने अंतिम फेरीपर्यंत ती ५ गुणांच्या फरकाने केली. शेवटी विकासने हा सामना ३-० ने जिंकत प्री - कॉर्टमध्ये प्रवेश केला.
पहिल्या २ पेरीत विकासने अप्परकटचा पुरेपुर वापर करत आपले वर्चस्व कायम राखले होते. पण १८ वर्षी कॉनवेलने शेवटच्या फेरीत पकड मजबूत करण्याचा अपयशी प्रयत्न केला. शेवटी पंचानी भारताच्या विकासचा विजयी घोषित केले. १२ ऑगस्ट रोजी प्री-क्वॉर्टर फेरीत विकास कृष्णनची लढत तुर्कस्तानच्या खेळाडूशी होणार आहे.
आतापर्यंत भारताला एकही पदक मिळाले नाही त्यामुळे भारताला कुस्ती आणि बॉक्सिंग या प्रकाराकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत.
दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिले तीन दिवस निराशजनक ठरल्यामतर चौथा दिवस भारतासाठी समिश्र ठरला. रोईंगमध्ये दत्तू भोकनलचे आव्हान संपुष्टात आले तर पुरुष हॉकी संघाने अर्जेंटिनाला 2-1 पराभूत करत भारताने क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.