टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचा सर्वत्र सत्कार समारंभ सुरू आहे. टोक्योतून मायदेशात परतल्यानंतर नीरजला सातत्यानं सत्कार समारंभ व मिरवणुकीत भाग घ्यावा लागत आहे. त्यामुळेच त्याची तब्येतही बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते. त्यानंतरही सत्कार सोहळे थांबण्याचं नाव घेत नाही. नीरजची एक्सक्यूजिव्ह मुलाखत घेण्यासाठीही चढाओढ रंगली आहे. अशीच एक मुलाखत RJ मलिष्कानं घेतली, पण ऑनलाईन मुलाखत घेताना मलिष्का अन् तिच्या सहकारी चक्क डान्स करताना दिसल्या. त्यावर नीरजला इच्छा नसताना हसावं लागतं होतं. मलिष्काच्या या व्हिडीओवर नेटिझन्स चांगलेच खवळले.
नेटिझन्स काय म्हणतात ते बघा...