शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

विनेश फोगाटला 'तारीख पे तारीख'; अपात्रता प्रकरणावर आता १६ ऑगस्टला निकालाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 6:10 AM

अपात्रतेच्या निर्णयाला विनेश मार्फत भारतीय कुस्ती महासंघाने आव्हान दिल्याची माहिती आयओएने दिली.

पॅरिस: कुस्तीपटू विनेश फोगाट प्रकरणी अपात्रता प्रकरणावर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनने पुन्हा एकदा निकाल पुढे ढकलला असून याप्रकरणी आता १६ ऑगस्ट रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री साडेनऊला निकाल येण्याची अपेक्षा होती. पण तो पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला. ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजन गटाच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशला १०० ग्रॅम वजन अधिक असल्याच्या कारणास्तव अपात्र घोषित करण्यात आले होते. त्या निर्णयाला विनेश मार्फत भारतीय कुस्ती महासंघाने आव्हान दिल्याची माहिती आयओएने दिली.

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसने (सीएएस) भारताची महिला मल्ल विनेश फोगाटच्या याचिकेवरील निर्णय मंगळवारी लांबणीवर टाकला. आता यावर १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी फैसला होणार आहे. विनेशच्या याचिकेवर आधी ऑलिम्पिक संपण्याआधी अर्थात ११ ऑगस्टपूर्वी निर्णय होणार होता. नंतर तो १३ ऑगस्टला होईल, असे जाहीर करण्यात आले. मंगळवारी हा निर्णय आणखी लांबणीवर गेला.

१०० ग्रॅम वजन अधिक असल्याचे कारण देत पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो वजन गटाची फायनल खेळण्यापासून विनेशला रोखले होते. तिच्यावर अपात्रतेची कारवाई झाली. विनेशने या विरोधात सीएएसकडे दाद मागितली आहे.

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमातील एक चूक विनेशला रौप्य मिळवून देणारी ठरू शकते. तसे न झाल्यास यूडब्ल्यूडब्ल्यूच्या संपूर्ण यंत्रणेवर वर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. २९ वर्षांच्या विनेशला ७ ऑगस्ट रोजी सुवर्णपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या सारा हिल्डबॅन्डविरुद्ध खेळण्याची परवानगी नाकारली. अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले.

यूडब्ल्यूडब्ल्यूने दुसऱ्या खेळाडूसाठी त्याच नियमांत बदल केल्याची बाब समोर आली आहे. त्यांच्या नियमांनुसार एखादा खेळाडू अंतिम फेरीत पोहचणाऱ्या स्पर्धकांकडून आधी पराभूत झाला असेल तरच तो रिपेचेजसाठी (कांस्यपदकाचा सामना) पात्र ठरू शकतो. त्यामुळे जर विनेशला अपात्र ठरवून स्पर्धेत शेवटचे स्थान दिले गेले, तर उपउपांत्यपूर्व फेरीत विनेशकडून पराभूत झालेली युई सुसाकी रिपेचेज फेरीत कशी पोहोचली आणि शेवटी कांस्य जिंकली? हा प्रश्न उपस्थित होतो.

विनेश ज्या गटातून खेळली, त्यातून जर कोणी रिपेचेज राउंडसाठी पात्र ठरत असेल तर ती तुर्कीची एव्हिन डेमिरहान असायला हवी, जिचा युस्नेलिस गुझमनने पहिल्या फेरीत पराभव केला होता. उपांत्य फेरीत विनेशकडून ५-० ने पराभूत होऊनही गुझमन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. कारण, भारतीय कुस्तीपटू अपात्र ठरली होती. त्यामुळे सीएएस निश्चितपणे यूडब्ल्यूडब्ल्यूला प्रश्न करू शकते की त्यांनी एका प्रकरणात एक आणि दुसऱ्या प्रकरणात दुसरा नियम कसा लागू केला? हाच प्रश्न विनेशला रौप्यपदक मिळवून देणारा ठरू शकतो.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्ती