शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

विनेशप्रमाणेच मेरी कोम अडचणीत आलेली; अवघ्या 4 तासांत कमी केले होते 2 kg वजन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 2:55 PM

विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर खेळाडूंच्या वजनाची बरीच चर्चा सुरू आहे.

Vinesh Phogat Disqualified : भारतीय कुस्तीपटूविनेश फोगटला (Vinesh Phogat) अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेशचे वजन काही ग्रॅम जास्त आढळल्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, आता कुस्तीमधील वजनाशी संबंधित नियमांची चर्चा सुरू झाली आहे.  लोकांचे म्हणणे आहे की, व्यायाम करुन विनेशला आपले काही ग्राम वजन कमी करता आले असते. यापूर्वीही अनेक खेळाडूंनी अशाप्रकारे वजन कमी केले आहे. भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) अशाच प्रकारे काही वेळात आपले वजन कमी केले होते.

मेरी कोमचे काय प्रकरण आहे?मेरी कोमने पोलंडमधील सिलेशियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी तिला 48 किलो वजनी गटात खेळायचे होते, परंतु तिचे दोन किलो वजन जास्त भरत होते. त्यावेळी मेरी कोमने या कॅटेगरीत अपात्र ठरू नये म्हणून अवघ्या चार तासांत दोन किलो वजन कमी केले होते. यासाठी तिने एक तास स्किपिंग आणि इतर व्यायाम करुन आपले वजन कमी केले होते. 

खेळाडूंचे वजन इतक्या लवकरच कमी कसे होते?तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, ॲथलीट्स इतक्या लवकर आपले वजन कमी कसे करतात. तर, यासाठी ते आपला व्यायाम वाढवतात आणि यादरम्यान खास कपडे घालतात, ज्यामुळे व्यायाम करताना जास्त घाम येतो. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी लवकर कमी होते आणि वजनही झटक्यात कमी व्हायला मदत मिळते.

विनेश फोगटच्या प्रकरणात काय झाले?आपण विनेश फोगटच्या केसबद्दल बोललो तर, तिला वजन कमी करण्यासाठी खुप कमी वेळ दिला गेला. कुस्तीच्या नियमांनुसार, सामन्यापूर्वी पैलवानांचे वजन केले जाते आणि वजन जास्त भरल्यास त्यांना वजन कमी करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ दिला जातो. विनेशच्या प्रकरणातही हेच झाले, तिला कमी वेळ मिळाला, ज्यामुळे ती आपले वजन कमी करू शकली नाही.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Mary Komमेरी कोमVinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्ती