भारतीय कुस्तीपटूविनेश फोगट हिने सोमवारी पॅरिस ऑलिम्पिक गेम्सच्या समारोप सोहळ्यानंतर ऑलिम्पिक गाव सोडलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जोरदार मुंसडी मारत विनेश फोगट अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती.
पण अतिरिक्त वजनामुळे गोल्ड मेडलच्या मॅचआधी तिला अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात विनेशनं फोगाट हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) धाव घेतली आहे. संयुक्तरित्या रौप्य पदक मिळावे, अशी मागणी तिने संबंधित याचिकेच्या माध्यमातून केली आहे.
तारीख पे तारीख सीन!
आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाच्या (CAS) तारीख पे तारीख या सिलसिल्यानंतर मंगळवारी या बहुप्रतिक्षित खटल्याचा निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. या निकालाआधी कुस्तीपटू मायदेशीर परतली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करताना विनेश फोगाट हिने 50 किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारातील गत ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत आघाडीवर असणारी जपानची युई सुसाकी हिला पराभूत करत आपली जादू दाखवली होती. तिचा हा विजय भारतासाठी कुस्तीच्या आखाड्यातून सुवर्ण पदकाची चाहुल घेऊन आला. ऐतिहासिक कामगिरीसह अंतिम फेरी गाठल्यावर 100 ग्रॅम वजनानं घात झाला.
वजन कमी करण्यासाठी खूप काही केलं, शेवटी रुग्णालयात दाखल करण्याचीही आली वेळ
ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर विनेश फोगाटचे वजन जवळपास ३ किलोंनी वाढले होते. कोणत्याही परिस्थितीत सुवर्ण संधी सोडायची नाही, हे लक्षात घेऊन तिने वजन कमी करण्यासाठी कठोर प्रयत्न केले. या कसरतीमुळे डिहाड्रेशनमुळे ती बेशुद्धही पडली होती. त्यानंतर तिला ऑलिम्पिक गावातातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या नाजूक परिस्थितीतून सावरतच विनेश फोगाटनं संयुक्त रौप्य पदक मिळावे, .यासाय़ी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे धाव घेतली. आता तिची प्रकृतीही ठिक आहे. पण सध्या ती कोणासोबतही काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. निकाल कधी येणार? त्यावर तिची पहिली प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तिला रौप्य पदकाचा सन्मान मिळेल, हीच आस
विनेश फोगाट हिने क्यूबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुजमान लोपेजसह संयुक्तरित्या रौप्य पदक देण्याचा विचार करावा, असे आपल्या याचिकेत म्हटलं आहे. भारतीय कुस्तीपटू अपात्र ठरल्यानंतर क्यूबाच्या कुस्तीपटूला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली होती. भारतीय ऑलिम्पिक समितीसह क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी क्रीडा लवाद या प्रकरणात सकारात्मक निर्णय देईल, अशी आशा व्यक्त केली आहे.