पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला जास्तीच्या १०० ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरवले होते. दरम्यान, तिने पदकाबाबत अपील केले होते. यावर आज निर्णय होणार आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या पदकाबाबत आज निर्णय होणार आहे. दरम्यान, याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विनेश फोगाटसाठी भारतीय वकील हरीश साळवे ऑलिम्पिकमधून तिला अपात्र ठरवल्याच्या प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
'बांगलादेशातील गोंधळामागे पाकिस्तानची ISI', शेख हसीना यांच्या मुलाचा मोठा दावा
भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि राजाचे वकील साळवे यांनी एएनआयला वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांची नियुक्ती IOA ने विनेश फोगटचा खटला कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये लढण्यासाठी केली असल्याची माहिती दिली.
विनेश फोगाटला ५० किलो वजनी गटातून अपात्र ठरवण्यात आले, कारण अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले होते. आता विनेशने याविरोधात CAS मध्ये गुन्हा दाखल केला आहे. CAS मध्ये आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुनावणी सुरू होईल.
एक रुपयाही फी घेतली नाही
याआधी हरीश साळवे यांनी पाकिस्तानमध्ये कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला लढवला होता. लाखो रुपयांची फी घेणारे साळवे त्यावेळी एक रुपयाही घेतला नाही. या प्रकरणात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटने गुरुवारी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
कुस्ती महासंघाने निवृत्ती मागे घेण्यास सांगितले
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी प्रतिक्रिया देत फोगट यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. संजय सिंह एएनआय या वृत्तसंस्थेवर बोलताना म्हणाले की, फोगटची घोषणा घाईघाईने करण्यात आली आहे असे दिसते आणि त्यांनी भारतात परतल्यावर त्यांच्या निवृत्तीबद्दल त्यांचे कुटुंब, महासंघ आणि इतर क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.