शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
3
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
4
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
5
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
6
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
7
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
8
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
9
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
10
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
11
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
12
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
13
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
14
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
15
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
16
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
17
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
18
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
19
Pitru Paksha 2024: घरातल्या भिंतीवर पूर्वजांच्या लावलेल्या तसबीरींची दिशा तपासून बघा; वास्तुदोष टाळा!
20
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

विनेश फोगाटच्या सहकारी खेळाडूची 'गोल्डन' कामगिरी; अखेर तिच्या गावात 'सुवर्ण पदक' आलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 5:00 PM

neha sangwan gold medalist : नेहा सांगवानने सोनेरी कामगिरी केली.

vinesh phogat village balali : ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला एकही सुवर्ण पदक जिंकता आले नाही. खरे तर विनेश फोगाटच्या रूपात भारतीय शिलेदार गोल्डन कामगिरी करेल या आशेवर तमाम भारतीय ऑलिम्पिक पाहत होते. पण, अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला पदकानेच नाही तर नशिबाने देखील हुलकावणी दिली. फायनलच्या लढतीआधी तिचे १०० ग्रॅम वजन वाढल्याने भारताच्या हक्काचे पदक गेले. तिला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण तिथेही भारताला मोठा धक्का बसला. विनेशला खाली हात मायदेशात परतावे लागले. मात्र, तिने केलेल्या गोल्डन कामगिरीने तमाम देशवासियांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 

दरम्यान, रौप्य पदक देण्याची विनेशची मागणीही फेटाळण्यात आली. त्यामुळे विनेशला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. आता विनेशची सहकारी खेळाडू नेहा सांगवानने सुवर्ण कामगिरी केली. आपल्या लेकीला स्पर्धेबाहेर व्हावे लागल्याने विनेशच्या बलाली गावात एकच शांतता पसरली होती. मात्र, आता १६ वर्षाच्या कुस्तीपटूने बलाली ग्रामस्थांना खुशखबर दिली. 

नेहा सांगवानची सोनेरी कामगिरी बलालीच्या नेहा सांगवानने १७ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. नेहाचा हा विजय विनेश आणि तिच्या गावातील लोकांच्या जखमा भरून काढू शकत नसला तरी त्यांना नक्कीच काहीसा दिलासा देऊ शकतो. कारण विनेशचीही तिच्या गावातील आणखी कुस्तीपटूंनी देशाचा गौरव करावा अशी इच्छा होती. नेहाने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या सो सुसाईचा १०-० असा दारुण पराभव केला. नेहाने हा विजय विनेशला समर्पित केला.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४