शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
6
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
8
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
9
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
10
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
11
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
12
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
13
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
14
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
15
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
16
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
17
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
18
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
19
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
20
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा

ड्रेसिंग रूमच्या वादात मीडियानं डोकावू नये, कुंबळे शानदार प्रशिक्षक- विनोद राय

By admin | Published: June 25, 2017 1:39 PM

सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनीही कोहली आणि कुंबळेच्या वादावर प्रतिक्रिया दिली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25- सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनीही कोहली आणि कुंबळेच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. विनोद राय यांनी भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची स्तुती केली आहे. भारतीय टीम चांगला खेळ करत असून, त्यांच्यातील एकी कायम राहील हे आम्ही सुनिश्चित करणार आहोत. कोहलीला कुंबळेची काम करण्याची पद्धत आवडत नसल्यानंच कुंबळेनं राजीनामा दिला आहे. मीडियानं या प्रकरणात जास्त लक्ष घालू नये, असा सल्लाही विनोद राय यांनी दिला आहे. सीओएच्या बैठकीनंतर ते म्हणाले, जर दोन माणसांना सात दिवस 24 तास एकत्र ठेवल्यास कदाचित त्यांच्यात मतभेद होऊ शकतील. एखाद्या संघातील कर्णधार आणि प्रशिक्षक दोघांची भिन्न मते असल्यास त्यानं व्यावसायिक तोटा होतो. कुंबळे हे परिपक्व व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळेच त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. शेवटी कर्णधारालाच मैदानावर खेळावं लागतं. कुंबळेंची भूमिका पूर्णतः योग्य होती. त्यांनी एक प्रशिक्षक म्हणून फार चांगलं काम केलं आहे. आम्ही भारतीय संघ एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करू, मग तो कर्णधार असू देत किंवा मॅनेजर, संघात एकोपा टिकला पाहिजे. कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या वादात मीडियानं डोकं न घालता कोणत्याही निष्कर्षापर्यंत येऊ नये. भारतीय मीडिया घर आणि बेडरूममध्ये डोकावत नाही, त्यामुळे कृपा करून मीडियानं ड्रेसिंग रूममध्येही डोकावून पाहू नये, असा सल्ला राय यांनी मीडियाला दिला आहे.