युवराजची १२ वा खेळाडू म्हणून झालेली निवड सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का ठरला. बीसीसीआयने फेसबुकच्या माध्यमातून सुरु केलेल्या या उपक्रमाला क्रिकेटचाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रत्येक क्रमांकाच्या खेळाडूसाठी उपलब्ध करुन दिलेल्या खेळाडूंमध्ये चाहत्यांनी भारताचा सर्वोत्तम संघ निवडला आहे. १२व्या क्रमांकासाठी युवीसह चंदू बोर्डे, हेमू अधिकारी, मन्सूर अली खान पतौडी आणि एकनाथ सोलकर अशा दिग्गजांचा समावेश होता. मात्र, तब्बल ६२ टक्के मत मिळवताना युवीने बाजी मारली.
त्याचवेळी सलामीवीर म्हणून चाहत्यांनी लिटिल मास्टर सुनील गावसकर आणि विध्वंसक फलंदाज विरेंद्र सेहवाग यांची निवड केली. पहिला सलामीवीर म्हणून गावसकर यांनी बाजी मारली. त्याच्यासह पंकज रॉय, नवज्योत सिंग सिध्दू, वसीम जाफर व मुरली विजय यांचा समावेश होता. तर दुसरा सलामीवीर म्हणून सेहवागने के. श्रीकांत, गौतम गंभीर, चेतन चौहान व विजय मर्चंट यांना मागे टाकले.
त्याचवेळी, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी अनुक्रमे ‘दी वॉल’ राहुल द्रविड आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची एकतर्फी निवड झाली. या दोघांना इतर कोणाकडूनही स्पर्धा मिळाली नाही. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकासाठी कोहलीचाही पर्याय होता. मात्र सचिनपुढे त्याचा काहीच निभाव लागला नाही. तर, यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीची वर्णी लागली. शिवाय संघाची धुरादेखील त्याच्याकडेच सोपविण्यात आली.चाहत्यांनी निवडलेली ‘ड्रीम टीम’ :सुनील गावसकर, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक व कर्णधार), रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे, जवगल श्रीनाथ, झहीर खान आणि युवराज सिंग
Here are the results of India's #DreamTeam as per fan votes #500thTestpic.twitter.com/RgnrBhwLBw— BCCI (@BCCI) September 26, 2016