नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ एप्रिल रोजी होणाऱ्या लढतीद्वारे पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहे. कोहलीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो घाम गाळत असल्याचे दिसत आहे. कोहली वेट ट्रेनिंग करीत असल्याचे या व्हिडीओमध्येदिसत असून तो हळूहळू पूर्ण फिटनेस मिळवत आहे. कोहलने पोस्टमध्ये लिहिले, की ‘मैदानावर परतण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. आता पुनरागमनासाठी सज्ज आहे ??? १४ एप्रिल? कोहलीने पोस्टवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. याचा अर्थ त्याचे पुनरागमन अद्याप निश्चित नाही. (वृत्तसंस्था)
विराटला मुंबईविरुद्ध पुनरागमनाची आशा
By admin | Published: April 12, 2017 3:29 AM