शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

विजयपाठोपाठ विराटचेही शतक, पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 356

By admin | Published: February 09, 2017 10:03 AM

हैदराबाद कसोटीत मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही शतक फटकावले आहे. पहिल्या दिवसअखेर भारताच्या

 ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 9 - एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर हुकुमत राखली. सलामीवीर मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 356 धावा कुटल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट 111 तर अजिंक्य रहाणे 45 धावांवर खेळत होते.  
मुरली विजय शतक फटकावून बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेत खेळाच्या तिसऱ्या सत्रात पाहुण्या गोलंदाजांना झोडपून काढले. कोहलीची फटकेबाजी पाहून रहाणेनेही फलंदाजीचा गिअर बदलला. दरम्यान,  आक्रमक पवित्रा  घेणाऱ्या विराटने आपले कसोटी कारकीर्दीतील 16वे शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या 130 चेंडूतच शतकी मजल मारली. दरम्यान त्याने अजिंक्य रहाणेसोबत अभेद्य 122 धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 3 बाद 356 धावांपर्यंत मजल मारून दिली. 
त्याआधी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. मात्र लोकेश राहुल (2) स्वस्तात बाद झाल्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि मुरली विजयने डाव सावरत उपाहारापर्यंत भारताला 1 बाद 86 धावांपर्यंत मजल मारून दिली. विजय आणि पुजाराच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची भागीदारी करत भारताला सुस्थितीत पोहोचवले. दरम्यान, पुजार 83 धावांवर बाद झाला. पण विजयने मात्र आपले शतक पूर्ण केले. विजयचे हे कसोटी क्रिकेमधील नववे शतक ठरले. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर विजय फारवेळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही आणि 108 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (111) आणि अजिंक्य रहाणे (45) यांनी शतकी भागीदारी कर भारताला  साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. बांगलादेशकडून तस्किन अहमद, मेहदी हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.