शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विराट कोहली फलंदाजीत ‘एक नंबर’ स्थानावर

By admin | Published: March 30, 2016 2:53 AM

तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धडाकेबाज विराट कोहलीने सध्या सर्वच गोलंदाजांच्या मनात धडकी भरविली असून, नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या

नवी दिल्ली : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धडाकेबाज विराट कोहलीने सध्या सर्वच गोलंदाजांच्या मनात धडकी भरविली असून, नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत त्याने फलंदाज म्हणून अग्रस्थान पटकावले आहे. त्याचवेळी टीम इंडियानेही आपले अग्रस्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे.कोहलीने गत चार सामन्यांत १८४ धावा फटकावताना १३२ ची जबरदस्त धावगती राखली असून, त्याने ९२ च्या शानदार सरासरीने फटकेबाजी केली आहे. विशेष म्हणजे, आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार ही क्रमवारी जाहीर होण्याआधी कोहली आॅस्टे्रलियाच्या अ‍ॅरोन फिंचहून २४ अंकांनी पिछाडीवर होता. मात्र, आता कोहलीने तब्बल ६८ गुणांनी मजबूत आघाडी घेतली आहे. त्याचवेळी गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये मात्र भारताला धक्का बसला आहे.वेस्ट इंडीजच्या सॅम्युअल्स् बद्री याने पुन्हा एकदा आयसीसी टी-२० क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावताना भारताचा टॉप स्पिनर रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. बद्रीने आतापर्यंत चार सामन्यांत एकूण ६ बळी घेतले असून, अश्विनने चार सामन्यांतून चार बळी घेतले आहेत. यामुळे अश्विनची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहीरने दुसऱ्या स्थानी झेप घेतली. सांघिक क्रमवारीवर नजर टाकल्यास अव्वल पाचपैकी चार संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात दिल्ली व मुंबई येथे खेळतील. बलाढ्य भारताने १२७ गुण कायम राखताना अग्रस्थान कायम राखले आहे. त्याचवेळी विश्वचषकमध्ये आतापर्यंत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडला सहा गुणांचा फायदा झाला असून, त्यांनी दोन स्थानांनी प्रगती करीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. वेस्ट इंडीजनेही दोन अंकांनी प्रगती करताना तृतीय स्थान पटकावले. तर द. आफ्रिका आणि इंग्लंड प्रत्येकी ११५ गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. टॉप ५फलंदाज १. विराट कोहली (भारत - ८७१ गुण), २. अ‍ॅरोन फिंच (आॅस्टे्रलिया - ८०३), ३. मार्टिन गुप्टील (न्यूझीलंड - ७६२), ४. फाफ डू प्लेसिस (द. आफ्रिका - ७४१), ५. अ‍ॅलेक्स हेल्स (इंग्लंड - ७३७).गोलंदाज १. सॅम्युअल्स् बद्री (वेस्ट इंडीज - ७५३), २. इम्रान ताहीर (द. आफ्रिका - ७४०),३. रविचंद्रन अश्विन (भारत - ७२५), ४. शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान - ६७४), ५. काएल एबॉट (द. आफ्रिका - ६७१)अष्टपैलू १. शेन वॉटसन (आॅस्टे्रलिया - ३७३), २. शाकिब अल हसन (बांगलादेश - ३४६), ३. शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान - ३३२), ४. ग्लेन मॅक्सवेल (आॅस्टे्रलिया - ३२९), ५. मार्लेन सॅम्युअल्स् (वेस्ट इंडीज - २७६).अष्टपैलू १. शेन वॉटसन (आॅस्टे्रलिया - ३७३), २. शाकिब अल हसन (बांगलादेश - ३४६), ३. शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान - ३३२), ४. ग्लेन मॅक्सवेल (आॅस्टे्रलिया - ३२९), ५. मार्लेन सॅम्युअल्स् (वेस्ट इंडीज - २७६).

देशगुण१. भारत१२७२. न्यूझीलंड१२२३. वेस्ट इंडीज१२०४. द. आफ्रिका११५५. इंग्लंड११५सांघिक क्रमवारीत लक्ष वेधले ते अफगाणिस्तानने. गेल्या काही सामन्यांपासून चमकदारक खेळाने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधलेल्या अफगाणिस्तानने यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा निरोप घेताना बलाढ्य वेस्ट इंडीजला नमवून सनसनाटी निकाल नोंदविला. या विजयाचा फायदा संघाला झाला असून, अफगाण संघ ८१ गुणांसह नवव्या स्थानी आहे. तर त्यांच्याखाली बांगलादेश ७४ गुणांसह दहाव्या स्थानी विराजमान आहे. टी-२० टॉप टेन क्रमवारीत आयसीसीचा सहयोगी सदस्य म्हणून अफगाणिस्तान एकमेव संघ आहे.