शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

विराट कोहली अव्वल १० मध्ये एकमेव भारतीय

By admin | Published: May 31, 2017 12:49 AM

विराट कोहली आयसीसी वन-डे क्रिकेटपटूंच्या मानांकनामध्ये अव्वल १० मध्ये समावेश असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे.

लंडन : विराट कोहली आयसीसी वन-डे क्रिकेटपटूंच्या मानांकनामध्ये अव्वल १० मध्ये समावेश असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरे स्थान कायम राखले आहे. वैयक्तिक मानांकनासाठी चुरस असल्यामुळे आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित होते. या स्पर्धेत अव्वल आठ संघांचा सहभाग आहे. त्यातील मानांकनामध्ये आघाडीच्या खेळाडूंदरम्यान विशेष फरक नाही. अव्वल तीन फलंदाज दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स (८७४ मानांकन गुण), आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (८७१ मानांकन गुण) आणि विराट कोहली (८५२ मानांकन गुण) यांच्यामध्ये केवळ २२ अंकांचा फरक आहे. फलंदाजांच्या यादीमध्ये अव्वल २० मध्ये रोहित शर्मा (१२ वे स्थान), महेंद्रसिंह धोनी (१३ वे स्थान) आणि शिखर धवन (१५ वे स्थान) यांचा समावेश आहे. धवनची दोन स्थानाने घसरण झाली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय अव्वल १० मध्ये नाही. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा अव्वल स्थानी आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीसोबत संयुक्तपणे ११ व्या स्थानी, तर अमित मिश्रा १३ व्या स्थानी आहे. या दोन्ही खेळाडूंचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश नाही. रविचंद्रन आश्विन संयुक्तपणे १८ व्या स्थानी आहे. अव्वल तीन गोलंदाजांमध्ये रबाडा (७२४ मानांकन गुण), इम्रान ताहिर (७२२ मानांकन गुण) आणि मिशेल स्टार्क (७०१ मानांकन गुण) यांच्यादरम्यान केवळ २३ मानांकन गुणांचे अंतर आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे प्रत्येकी ४ फलंदाज व न्यूझीलंडचे ३ आणि आॅस्ट्रेलिया व पाकिस्तानचे प्रत्येकी २ फलंदाज अव्वल २० मध्ये आहेत. त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये बांगलादेश व इंग्लंडचे प्रत्येकी तीन व न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व आॅस्ट्रेलियाच्या प्रत्येकी दोन गोलंदाजांचा अव्वल २० मध्ये समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये बांगलादेशचा शाकीब-अल-हसन अव्वल स्थानी आहे. इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा अव्वल १० मध्ये समावेश आहे. द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाविजय साकरणाऱ्या इंग्लंड संघाला दोन मानांकन गुणांचा लाभ झाला आहे. संघांच्या क्रमवारीत आघाडीच्या संघांदरम्यान विशेष अंतर नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लढत रंगतदार राहील. वन-डेमध्ये आघाडीच्या ५ संघांदरम्यान द. आफ्रिका (१२२ गुण), आॅस्ट्रेलिया (११८ गुण), भारत (११७ गुण), न्यूझीलंड (११४ गुण) व इंग्लंड (११२ गुण) यांच्यादरम्यान विशेष मानांकन गुणांचे अंतर नाही. (वृत्तसंस्था)