ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - दोन वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपला गाशा गुंडाळावा लागला. दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेटची वेबसाइट क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या प्लेयिंग इलेव्हन संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताचा कर्णधार विराट कोहलीची चक्क 12 वा खेळाडू म्हणून निवड केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विशेष म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या संघामध्ये दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू एबी डिव्हिलिअर्सला जागा मिळालेली नाही. याशिवाय भारताचा महेंद्रसिंग धोनी आणि खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ यालाही जागा मिळवण्यात अपयश आलं आहे. या संघात इंग्लंडच्या सर्वाधिक म्हणजे 4 खेळाडूंची वर्णी लागली आहे. शिवाय कर्णधारपदीही इंग्लंडच्या इऑन मॉर्गनची निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय इंग्लंडकडून धडाकेबाज खेळाडू जो.रूट, अष्टपैलू बेन स्टोक्स आणि फिरकीपटू आदिल रशीद यांना स्थान मिळालं आहे.
सलामीविर म्हणून भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनला स्थान देण्यात आलं असून त्याच्यासोबत दुसरा सलामीवीर म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खो-याने धावा काढणा-या तमिम इकबालची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या केवळ जॉश हेझलवूड या एकाच खेळाडूला या संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे.
असा आहे संघ-
शिखर धवन(भारत)
तमिम इक्बाल(बांगलादेश)
केन विल्यम्सन(न्यूझीलंड)
जो. रूट(इंग्लंड)
इऑन मॉर्गन(इंग्लंड)
बेन स्टोक्स(इंग्लंड)
निरोशन डिकवेला(श्रीलंका)
अदिल रशिद(इंग्लंड)
हसन अली (पाकिस्तान)
जॉश हेझलवूड(ऑस्ट्रेलिया)
विराट कोहली(भारत)
सानियाचा "तो" फोटो शेअर करून रामूने पुन्हा ओढवला वाद
जिंकण्यासाठी तुम्हाला कटू बोलावं लागतं - विराट कोहली
सेहवागला अपशब्द वापरणा-या पाक माजी क्रिकेटपटूला मनोज तिवारीचं उत्तर