लंडन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या कारकिर्दीमध्य आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. क्रिकेटचे बायबल समजल्या जाणाऱ्या ‘विस्डेन’ या वार्षिकांकाच्या मुखपृष्ठावर विराट कोहली अवतरला आहे. ‘विस्डेन’ क्रिकेटर्स अलमनॅक पुस्तिकेने विराट कोहलीला २०१६ या वर्षातील जगातील सर्वोत्कृष्ट क्रि केटपटू जाहीर केले आहे.विराट कोहलीची गेल्या वर्षभरातील कामगिरी त्याच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरली. कोहलीने सलग चार कसोटी सामन्यांत चार द्विशतके ठोकण्याचा पराक्र म देखील याच वर्षात केला. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरु द्ध कसोटी मालिका ंिजंकल्या. कोहलीने यंदाच्या हंगामात २५९५ धावा ठोकल्या असून त्यात सात शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. या धडाकेबाज कामगिरीने सहकाऱ्यांनाही आत्मविश्वास मिळतो. आॅस्ट्रेलियाविरु द्धच्या कसोटी मालिकेत कोहलीच्या धावांना ब्रेक लागला होता. तिन्ही कसोटीत तो अपयशी ठरला होता. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला एका कसोटीस मुकावे लागले.दरम्यान, कोहलीला ‘विस्डेन’ने जागतिक अव्वल खेळाडूचा सन्मान दिला, तर आॅस्ट्रेलियाच्या एल्स पेरी हिला जगातील अव्वल दर्जाची महिला क्रि केटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. मिस्बाह-उल-हक, युनूस खान, बेन डकेट, ख्रिस वोक्स यांचाही ‘क्रि केटर आॅफ द इअर’ म्हणून गौरव करण्यात आला. काही दिवसांआधी कोहलीला बीसीसीआयचा ‘पॉली उम्रिगर’ पुरस्कारदेखील मिळाला होता. (वृत्तसंस्था)>विस्डेनने गौरविलेले क्रिकेटपटूरिकी पाँटिंग (२००३), शेन वॉर्न (२००४), अॅण्ड्रयू फ्लिन्टॉफ (२००५), मुथय्या मुरलीधरन (२००६), जॅक कालिस (२००७), वीरेंद्र सेहवाग (२००८ आणि २००९), सचिन तेंडुलकर (२०१०), कुमार संगकारा (२०११), मायकेल क्लार्क(२०१२), डेल स्टेन (२०१३), कुमार संगकारा (२०१४), केन विलियम्सन (२०१५)आणि विराट कोहली (२०१६).
विराट कोहलीच अव्वल
By admin | Published: April 06, 2017 4:16 AM