ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 : इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही, असा विश्वास महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी बुधवारी व्यक्त केला.कपिल म्हणाले,ह्यविराटच्या कर्तृत्वावर मला विश्वास असल्याने त्याच्या खेळावर शंका घेणे मला पटत नाही. सध्या तो चांगला खेळत नसला तरी लवकरच धावा काढेल. तो धावा काढायला लागेल तेव्हा संघातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. कर्णधार फॉर्ममध्ये असेल तर इतरांसाठी ते चैतन्यदायी ठरते. कोहलीने मागच्या सत्रात १६ कसोटी सामन्यात ९७३ धावा केल्यानंतरआयपीएलमध्ये दहा सामन्यात केवळ ३०८ धावा ठोकल्या. चॅम्पियन्समध्ये गतविजेत्या भारताला पहिला सामना ४ जून रोजी पाकविरुद्ध खेळायचा आहे. १९८३ मध्ये विश्वचषक जिंकून देणारे कपिल पुढे म्हणाले,डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचा मारा निर्णायक ठरेल. मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा हा खेळाडू इतका पुढे जाईल, असे वाटलेही नव्हते. पण तो मानसिकदृष्टया कणखर असा गोलंदाज आहे. बुमराहसारख्या युवा खेळाडूला पाहिले की याची जागा अन्य कुणी घेऊ शकेल,असे वाटत नाही. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करतात. फिरकीत अश्विन आणि रवींद्र जडेजा हे देशाचे सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे कपिल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेला संघ कागदावर तरी बलाढ्य वाटतो आहे. पण माझ्यामते यंदा भारतीय संघ खरोखर भक्कम असाच आहे. महेंद्रसिंग धोनी आणि युवराजसिंग यांच्या अनुभवाचादेखील लाभ मिळणार असल्याचे कपिल यांना वाटते. या दोघांनी क्षमतेनुरूप कामगिरी करीत युवा खेळाडूंपुढे आदर्श निर्माण करायला हवा, असे कपिल यांचे मत आहे. भारत- पाक सामन्याबद्दल ते म्हणाले,ह्यभारतीय संघ सरस असून चांगला खेळ करीत आहे. दुसरीकडे पाककडे गमविण्यासारखे काहीच नसल्याने सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. पण भारत बाजी मारेल, असे कपिल यांनी सांगितले
विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीत सूर गवसेल: कपिल
By admin | Published: May 17, 2017 7:34 PM