ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - ऑस्करविजेता विख्यात संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानच्या मार्गदर्शनाखाली एखादं तरी गाणं गायला मिळावं अशी अनेक गायकांची इच्छा असते. मात्र यावेळेस अशा एका व्यक्तीला रेहमानसोबत गायची संधी मिळाली आहे, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही आणि ती व्यक्ती म्हणजे भारताचा कसोटी क्रिकेट कर्णधार व तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेला स्टार खेळाडू विराट कोहली...
विराटचै मैदानावरील आक्रमक अंदाजच तूफान फटकेबाजी ही आपल्या सर्वांना माहित आहेच, पण मैदानाबाहेरही त्याच्या डान्सचा अनोख अंदाज अनेकांनी पाहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पार्टींमध्ये विराटचा गाता गळाही अनेकांनी अनुभवला आहे. मात्र आता हाच विराट एक प्रोफेशनल गायक म्हणून समोर येत असून ए.आर.रेहमानच्या मार्गदर्शनाखाली विराटचे रेकॉर्ड झालेले गाणं आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
फुटबॉलचं शॉर्टर व्हर्जन असलेल्या ' प्रीमिअर फुत्सल लीग'चा विराट कोहली ब्रँड अँम्बेसडेर असून त्याच लीगचे ' अँथम' आपल्याला विराटच्या आवाजात ऐकू शकणार आहोत. या प्रीमिअर लीगच्या अधिकृत अँथमचा काही भाग विराटच्या आवाज स्वरबद्ध करण्यात आला असून हे गाणं बनवलं आहे दस्तुरखुद्द ए.आर.रेहमान यांनीच... ‘नाम है फुत्सल..’ असे या अँथमचे बोल असून त्याचा म्युझिक व्हिडिओ येत्या दोन आठवड्यात लाँच होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून या गाण्यावर काम सुरु असून विराटला यात रॅप पार्ट देण्यात आल्याचे रेहमान यांनी नमूद केल आहे. विराटने मात्र ए. आर. रेहमान यांच्यासोबत काम करताना नर्व्हस वाटत असल्याचे म्हटले आहे. 'रेहमान सरांच्या शेजारी बसलो आहे... माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी, त्यांची (रेहमान) ऐकलेली सर्व गाणी आठवत आहेत' अशा शब्दातं विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
An honor to have spent some time with the legend, Mr. @arrahman. Genius at work & epitome of humility. Thank You Sir pic.twitter.com/SQOn8JxqVu— Virat Kohli (@imVkohli) June 6, 2016
१५ ते २४ जुलैदरम्यान 'फुत्सल प्रीमिअर लीग'चे सामने खेळवण्यात येणार असून त्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गोवा, कोची, हैदराबाद आणि बंगळुरु हे ८ संघ खेळणार आहेत. फुत्सल हे फुटबॉलचं शॉर्टर व्हर्जन असून हा खेळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेत प्रसिद्ध आहे.