शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

विराट कोहलीला सूर गवसेल

By admin | Published: May 18, 2017 3:58 AM

इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही

मुंबई : इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत विराटला सूर गवसेल. त्याच्या सध्याच्या खराब फॉर्मबद्दल चिंता बाळगण्याचे कारण नाही, असा विश्वास महान क्रिकेटपटू कपिलदेव यांनी बुधवारी व्यक्त केला.चॅम्पियन्समध्ये गतविजेत्या भारताला पहिला सामना ४ जून रोजी पाकविरुद्ध खेळायचा आहे. १९८३ मध्ये विश्वचषक जिंकून देणारे कपिल म्हणाले, ‘‘डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहचा मारा निर्णायक ठरेल. मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा हा खेळाडू इतका पुढे जाईल, असे वाटलेही नव्हते. पण तो मानसिकदृष्ट्या कणखर असा गोलंदाज आहे.’’बुमराहसारख्या युवा खेळाडूला पाहिले, की याची जागा अन्य कुणी घेऊ शकेल, असे वाटत नाही. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज अप्रतिम मारा करतात. फिरकीत आश्विन आणि रवींद्र जडेजा हे देशाचे सर्वोत्तम गोलंदाज आहेत, असे कपिल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेला संघ कागदावर तरी बलाढ्य वाटतो आहे. पण माझ्या मते यंदा भारतीय संघ खरोखर भक्कम असाच आहे. महेंद्रसिंह धोनी आणि युवराजसिंग यांच्या अनुभवाचादेखील लाभ मिळणार असल्याचे कपिल यांना वाटते. या दोघांनी क्षमतेनुरूप कामगिरी करीत युवा खेळाडूंपुढे आदर्श निर्माण करायला हवा, असे कपिल यांचे मत आहे.भारत-पाक सामन्याबद्दल ते म्हणाले, ‘‘भारतीय संघ सरस असून चांगला खेळ करीत आहे. दुसरीकडे पाककडे गमाविण्यासारखे काहीच नसल्याने सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. पण भारत बाजी मारेल.’’ (वृत्तसंस्था)विराटवर विश्वासकपिल म्हणाले, ‘‘विराटच्या कर्तृत्वावर मला विश्वास असल्याने त्याच्या खेळावर शंका घेणे मला पटत नाही. सध्या तो चांगला खेळत नसला तरी लवकरच धावा काढेल. तो धावा काढायला लागेल, तेव्हा संघातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. कर्णधार फॉर्ममध्ये असेल तर इतरांसाठी ते चैतन्यदायी ठरते.’’ कोहलीने मागच्या सत्रात १६ कसोटी सामन्यांत ९७३ धावा केल्यानंतर आयपीएलमध्ये दहा सामन्यांत केवळ ३०८ धावा केल्या.