शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

युवराजच्या धडाकेबाज खेळीने भाराताचा श्रीलंकेवर विराट विजय

By admin | Published: March 01, 2016 10:23 PM

विराट कोहलीची (नाबाद ५६) संयमी अर्धशतकी खेळी आणि युवराजच्या ३५ धांवाच्या आक्रमक खेळीच्या बळावर भारताने श्रीलंकेला ५ गड्यांनी पराभूत केले.

ऑनलाइन लोकमत

मिरपूर, दि. १ - विराट कोहलीची (नाबाद ५६) संयमी अर्धशतकी खेळी आणि युवराजच्या ३५ धांवाच्या आक्रमक खेळीच्या बळावर श्रीलंकेला ५ गड्यांनी पराभूत करत धोनी ब्रिगेडने २०१६च्या आशिया चषकाच्या अंतीम फेरीत धडक मारली आहे. आज पुन्हा एकदा विराट कोहलीच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर भारताने आशिया चषकात सलग तिसरा विजय संपादन केला.
 
विराटने ४७ चेंडूचा सामना करताना ७ चौकाराच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली. तर सुर गवसेलेल्या युवराजने धडाकेबाज फलंदाजी करताना १८ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३५ धावा काढून विजयात सिंहाचा वाटा उचलला. युवराज बाद झाला त्यावेळी सामना पुर्णपणे भारताच्या बाजुने झुकला होता. पण हार्दिक पांड्या २ धावावर बाद झाल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली होती. पंरतु मैदानावर एका बाजूने विराट कोहली असल्यामुळे भारताचे पारडे मजबूत होते. धोनीने ४ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. 
 
श्रीलंकेच्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली दोन्ही सलामीवीर १६ धावांत बाद झाले होते. ११ धावांवर सलामीवीर धवनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. कुलसेकराने त्याला एका धावेवर चंडीमलकरवी झेलबाद केले. त्यानंतर रोहित शर्मा १५ धावांवर कुलसेकराचा बळी ठरला. सुरेश रैनाला शांकाने २५ धावांवर बाद केले. विराट आणि रैनाने तिस-या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली होती.त्यांनतर आलेल्या युवराजने सांन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली धडाकेबाज खेळी करत भारताला तिसरा विजय मिळवून दिला. 
 
त्यापुर्वी, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेने निर्धारीत २० षटकात नऊ बाद १३८ धावा केल्या होत्या. कपुगेंदरा ३०, श्रीवर्धने २२ आणि अन्य फलंदाजांच्या छोटया खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला हे लक्ष्य दिले होते. 
 
श्रीलंकेकडून कपुगेंदरा आणि श्रीवर्धनमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक ४३ धावांची भागीदारी झाली. भारताकडून बुमराह, पांडया आणि अश्विनने प्रत्येकी दोन आणि नेहराने एक गडी बाद केला. श्रीलंकेला सहा धावांवर पहिला तर, १५ धावांवर दुसरा धक्का बसला. सलामीवीर चंडीमल अवघ्या ४ धावांवर बाद झाला. नेहराने त्याला धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर जयसूर्याला तीन धावांवर बुमरहाने धोनीकरवी झेलबाद केले.  दिलशानला १८ धावांवर पांडयाने अश्विनकरवी झेलबाद केले. संघाच्या ५७ धावा असताना कर्णधार मॅथ्यूज १८ धावांवर बाद झाला. पांडयाने त्याच्या यष्टया वाकवल्या. श्रीवर्धनेला अश्विनने २२ धावांवर रायनाकरवी झेलबाद केले.