ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. २४ - मोक्याच्या क्षणी संयमी पण आक्रमक शतकी खेळी खेळणाऱ्या विराट कोहलची ही शतकी खेळी वाया गेली. १८१ धावांचा डोंगर उभा करुन देखिल गोलंदाजांच्या सुमार कामगीरीमुळे कोहलीची शतकी खेळी वाया गेली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या १८१ धावांचा पाठलाग करताना गुजरात लायन्सने १९.३ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात विजय नोंदवला. गुजरात कढून ड्वेन स्मिथ आणि ब्रँडन मॅक्युलम यांनी ५.२ षटकात ४७ धावांची सलामी दिली. ड्वेन स्मिथ ने ३२ धावांचे योगदान दिले तर मॅक्युलमने ४२ धावा जोडल्या. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कर्णधार रैना आणि दिनेश कार्तिकने किल्ला लढवला, विजय दृष्टीपथात आला असे वाटत असतानाच कर्णधार रैना २८ धावावर बाद झाला. त्यांतर कार्तिक आणि जडेजाना विजय खेचून आणला. कार्तिकने धडाकेबाज फलंदाजी करत विजय खेचून आणला. त्याने ३९ चेंडूचा सामना करताना नाबाद ५० धावा केल्या. शेवटच्या षटकात जडेजाला वॅटसनने बाद केले. जडेजाने १० चेंडूत १२ धावांचे योगदान दिले. ब्राव्होने विजयी चौकार मारला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कडून केन रिचर्डसन, चहल, वॅटसन आणि तबरेज शम्सीने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
त्यापुर्वी, कर्णधार कोहलीच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने निर्धारित २० षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात १८० धावांचा डोंगर उभा केला. कोहलीच्या आक्रमक खेळीमुळे गुजरात लायन्ससमोर विजयासाठी १८१ धावांचे चॅलेंजीग लक्ष ठेवण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला यश आले. कोहलीने मागील सामन्यातील खेळीप्रमाणे या सामन्यातही धमाकेदार खेळीच प्रदर्शन केले. कर्णधाराला साजेशी खेळी करताना कोहलीने ६३ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली. आज के राहूल ऐवजी शेन वॅटसनला सलामीला खेळवण्यात आले पण त्याचा फारसा फरक पडला नाही. वॅटसन संघाच्या ८ धावा असताना ६ धावावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या डिव्हिलरलाही साजेशी खेळी करताना आली नाही, डिव्हिलर २० धावार बाद झाला. ७.४ षटकात ५६ धावा झाल्यानंतर के. राहूल आणि कर्णधार कोहली यांनी विकेट न गमावता संघाची धावसंख्या हलती ठेवली. के. राहूलने मधल्या फळीत धमाकेदार फलंदाजी करताना ३ षटकार आणि ४ चौकाराच्या मदतीने चेंडूत धावांची उपयोगी खेळी केली. गुजरातकडून कुलकर्णी आणि तांबे यशस्वी गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.