ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १७ - ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या तिस-या वनडे सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील वेगवान ७ हजार धावांचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी फक्त १९ धावांची आवश्यकता होती. या मालिकेतील आधीच्या दोन सामन्यात विराटने ९१ आणि ५९ धावांची खेळी केली होती.
वनडेमध्ये वेगवान ७ हजार धावांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सच्या नावावर होता. त्याने १७२ वनडेमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठला होता. विराटने १६९ सामन्यात ७ हजार धावा केल्या. डिविलियर्सला हा पल्ला गाठण्यासाठी दहावर्ष लागली विराटने आठपेक्षा कमी वर्षांमध्ये हा पल्ला गाठला.
डिविलियर्सच्या आधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर हा विक्रम होता. त्याने १८० सामन्यात ७ हजार धावा केल्या होत्या. विराटच्या नावावर २३ शतके आणि ३६ अर्धशतकांची नोंद आहे.