शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विराटचा द्विशतकांचा ‘चौकार’! ब्रॅडमन, द्रविडचा विक्रम मोडला

By admin | Published: February 11, 2017 12:25 AM

कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस पाडून दुहेरी शतकांचा ‘चौकार’ मारला.

कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस पाडून दुहेरी शतकांचा ‘चौकार’ मारला. सलग चार कसोटी मालिकेत द्विशतके ठोकणारातो क्रिकेटविश्वातील पहिला फलंदाज बनला आहे. या मालिकेत त्यानेसर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविडसारख्यांना मागे टाकले.आकडेवारीनुसार, विराटने ब्रॅडमन यांना मागे टाकले खरे; मात्र १९३०-३१दरम्यान ब्रॅडमन यांची द्विशतके शानदार होती. १९३०च्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध २२ वर्षांच्या ब्रॅडमन यांनी लॉर्डस्वर २५४, लीड्सवर ३३४ व ओव्हलवर २३२ धावा केल्या. या सर्व धावा एकाच मालिकेतील आहेत.जानेवारी १९३१मध्ये विंडीजविरुद्ध आॅस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत ब्रॅडमन यांनी ब्रिस्बेनमध्ये २२३ धावा केल्या. पुढच्या मालिकेत द. आफ्रिकेविरुद्ध पुन्हा २२६ धावा करीत सलग तीन मालिकांमध्ये द्विशतके झळकविणारे ते पहिले फलंदाज बनले होते.राहुल द्रविडने सलगपणे द्विशतकांची हॅट्ट्रिक २००३-०४मध्ये पूर्ण केली. २००३च्या आॅक्टोबरमध्ये अहमदाबाद येथे २२२, अ‍ॅडिलेड येथे डिसेंबर २००३ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध २३३ आणि पुढच्या मालिकेत पाकविरुद्ध करिअरमधील सर्वोत्तम २७० धावांची खेळी केली होती.कोहलीने वेस्ट इंडिज, न्यू झीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध चार मालिकेत द्विशतके ठोकली.मागच्या वर्षी जुलैमध्ये नॉर्थ साऊंड येथे पहिले द्विशतक (२०० धावा) झळकविल्यानंतर आॅक्टोबरमध्ये न्यू झीलंडविरुद्ध २११ धावा केल्या. मुंबईत इंग्लंडविरुद्ध डिसेंबरमध्ये करिअरमधील सर्वोत्कृष्ट २३५ धावांची खेळीदेखील केली. आज बांगलादेशविरुद्ध विराटने २०४ धावा ठोकल्या.टीमचाही विक्रम!टीम इंडियाने उभारलेल्या ६ बाद ६८७ धावा हादेखील विश्वविक्रम आहे. सलग तीन कसोटींत कुठल्याही संघाने ६०० वर धावा उभारलेल्या नाहीत. भारताने इंग्लंडविरुद्ध मुंबई आणि चेन्नई येथे अनुक्रमे ६३१ आणि ७५९ असा धावांचा हिमालय उभारला होता.