नवी दिल्ली : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या प्रचंड चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्याने सलग तीन मालिकांमध्ये विजय संपादन केला आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून अनेक देशांच्या दिग्गजांना मागे टाकण्याची त्याला संधी आहे.ही मालिका विराट कोहलीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विराटने मागील तिन्ही कसोटी मालिका आपल्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. विराटने आतापर्यंत १४ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. यात सात विजय, दोन पराभव, तर पाच कसोटी अनिर्णीत राहिल्या आहेत. या मालिकेत नेतृत्व करून त्याला विजय हजारे (१४ कसोटी), लाला अमरनाथ (१५ कसोटी) व अजित वाडेकर (१६ कसोटी) यांना मागे टाकण्याची संधी आहे.
दिग्गजांना मागे टाकण्याची विराटला संधी
By admin | Published: September 14, 2016 5:15 AM