शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

विराटमुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड लांबणीवर

By admin | Published: July 10, 2017 5:53 PM

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 -  भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती सौरव गांगलीने दिली आहे. आज मुंबईत मुख्य प्रशिक्षकपदासाठी झालेल्या मुलाखतीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्याने ही माहिती दिली. यावेळी बोलताना गांगुली म्हणाला, प्रशिक्षकासंबंधी अजून कोणताही निर्णय झालेला नाही. 2019 चा वर्ल्डकप लक्षात घेऊन नव्या कोचची निवड करण्यात येणार आहे.  2019 च्या वर्ल्डकपपर्यंत कोचबरोबरचा करार असेल. त्यामुळे भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा तात्काळ करण्याची गरज नाही, कर्णधार विराट कोहलीसह आणखी काही जणांबरोबर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. असे सौरव गांगुलीने स्पष्ट केले. 
आज मुंबईमध्ये झालेल्या तीन सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी)च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गांगुली आणि लक्ष्मण यांनी प्रशिक्षकपदासाठीच्या थेट मुलाखती घेतल्या. तर सचिन तेंडूलकरनं स्काईपद्वारे सहभाग नोंदवला.
प्रशिक्षकपदासाठी १० व्यक्तींनी बीसीसीआयकडे अर्ज सादर केले आहेत. त्यात शास्त्री यांच्याव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा (ओमान राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक), फिल सिमन्स आणि उपेंद्रनाथ ब्रह्मचारी (इंजिनियर, क्रिकेटची कुठलीही पार्श्वभूमी नाही) यांचा समावेश आहे. सीएसी या १०पैकी ६ उमेदवारांची मुलाखत घेतल्याचे वृत्त आहे. 
 
अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्या वादानंतर वीरेंद्र सेहवाग याचे नाव सुरुवातीला आघाडीवर होते. मात्र, रवी शास्त्री यांच्या एन्ट्रीनंतर सध्याच्या घडीला सेहवागचे नाव मागे पडताना दिसते आहे. सचिन तेंडुलकरने देखील रवी शास्री यांच्या नावाला पसंती दिली होती. यापूर्वीच्या प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीवेळी सल्लागार समिती सदस्य सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात वाद झाले होते. त्यात आता रवी शास्त्रींना सचिनचा पाठिंबा मिळाला आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
 
विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त आहे. कुंबळे-कोहली वादानंतर सीएसीला आपल्या पसंतीबाबत सावधगिरी बाळगावी लागेल; कारण नव्या प्रशिक्षकाला दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे.  शास्त्रीने सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता. पण बीसीसीआयने अर्ज स्वीकारण्याची मुदत ९ जुलैपर्यंत वाढविली त्या वेळी माजी कर्णधार शास्त्रीने अर्ज केला. आता शास्त्री या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कोहलीसोबतच्या चांगल्या संबंधांमुळे शास्त्री या पदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शास्त्री यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने ५० षटकांच्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. शास्त्री यांच्याबाबत सौरव गांगुली यांचे मत काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शास्त्री व सौरव यांनी यापूर्वी एकमेकांवर टीका केली होती.