शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

विराटच्या पार्टीत विजय माल्ल्याला पाहताच टीम इंडिया झाली आऊट

By admin | Published: June 06, 2017 6:03 PM

भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी लंडनमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विजय माल्ल्याने आपल्या पत्नीसह हजेरी लावली होती.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 6 - भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी लंडनमध्ये एका चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विजय माल्ल्याने आपल्या पत्नीसह हजेरी लावली होती. बीसीसीआयचा एका उच्चपदस्थ पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित होता, माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, कर्णधार विराट कोहलीच्या संस्थेनं आयोजित केलेल्या एका चॅरिटी डिनरला माल्ल्या अचानक उपस्थित राहिला. विराट किंवा त्याच्या संस्थेनं मल्ल्याला त्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं नव्हतं. कार्यक्रमाशी संबंधित अन्य कोणीतरी त्याला बोलावलेलं असावं. पण विजय माल्ल्याच्या उपस्थितीमुळं टीम इंडियाचे खेळाडू अस्वस्थ झाले होते प्रत्येकजण त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता. माल्लयाला तिथून जा असेही सांगता येत नव्हतं. त्यामुळे विराटसह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनीच तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विराटने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून जस्टिस एंड केयर ऑर्गनाइजेशनला फंड(पैसे) गोळा करणे हा मुख्य उद्देश होता. ही ऑर्गनाइजेशन मानवी तस्करी थांबवण्यासाठी प्रयत्न करते. या कार्यक्रमात कोच अनिल कुंबळे, माजी कर्णधार धोनी, युवराज, केदार जाधवसह इतर भारतीय खेळांडूनीही हजेरी लावली होती. रविवारी बर्मिंगहॅममध्ये भारत - पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिनधास्तपणे व्हीआयपी सेक्शनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्ल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या माल्ल्याने यानंतर ट्विटरवरुन आपलं म्हणणं मांडलं. "भारत - पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे", असं सांगत माल्ल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे आव्हानच देऊन टाकलं आहे. दरम्यान, भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून माल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. एप्रिलमध्ये माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती.दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले आहे.