मुंबई : लोकमत समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल रन आणि व्हर्च्युअल फ्रीडम रन या दोन्ही रनना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता दि. ६ सप्टेंबर रोजी लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रन घेण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच धावपटूंचा उत्साह आणि आरोग्याविषयीची जागरूकता अशीच टिकवून ठेवण्यासाठी ही विशेष ‘रन’ होत आहे.दि. ६ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ७ यावेळेत ही ‘रन’ होईल. लाल रंग हा आवड, साहस आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळेच या ‘रन’साठी खास लाल रंगाची निवड करण्यात आली आहे. लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल रेड रन या ‘रन’मध्ये जेव्हा सर्व धावपटू लाल रंगाचा टीशर्ट घालून धावतील, तेव्हा तो लाल रंग त्यांची फिटनेसबाबतची आवड, साहसाविषयीचे प्रेम आणि मॅरेथॉनसारख्या स्पर्धांसाठी लागणारी प्रचंड ऊर्जा दाखवून देईल. त्यामुळे फिटनेसबद्दल जागरूक रहा. सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला डिजिटल स्वरूपातला बीब, ई- प्रमाणपत्र आणि आकर्षक फिनिशर फोटोफ्रेम मिळेल.लाल रंगाचा टी-शर्ट घालून तुम्ही धावू शकतारजिस्ट्रेशनसाठी लिंक -http://bit.ly/LMVREDRUN
उद्या रंगणार व्हर्च्युअल रेड रन, लोकमत महामॅरेथॉनतर्फे विशेष आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 5:08 AM