ऑनलाईन लोकमत
लंडन, दि. 23, - महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न अखेर भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडला माफक धावसंख्येत रोखल्यावर पूनम राऊत आणि हरमनप्रीत कौर यांच्या झुंजार खेळाच्या जोरावर भारतीय महिला संघाने या आव्हानाचा --- षटकात फडशा पाडला. समोर माफक आव्हान असले तरी सलामीची स्मृती मंधाना (0) आणि कर्णधार मिताली राज (17) या झटपट बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला होता. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या पूनम राऊतने हरमनप्रीत कौरच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत भारताचे आव्हान कायम ठेवले. मात्र पूनम राऊत (87) आणि वेदा कृष्णमूर्ती (35) या बाद झाल्यानंतर भारताची तळाची फळी कोसळली. सहा बळी टिपणाऱ्या अॅना श्रबशोले हिने सहा बळी टिपत यजमान संघाला लढतीत पुनरागमन करून दिले. अखेर भारतीय महिला संघाला 9 धावांनी पराभव पत्करावा लागला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय इंग्लंडच्या अंगाशी आला. झुलन गोस्वामी, पूनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांच्या भेदक माऱ्यामुळे चांगली सलामी मिळाल्यानंतर त्याचा फायदा इंग्लिश फलंदाजांना उचलता आला नाही. लॉरेन विल्फ्रेड (24) टॅमी बेमाँट (23) आणि हेदर नाइट (1) या झटपट बाद झाल्या. त्यामुळे इंग्लिश संघावर दबाव आला.
त्यानंतर सार टेलर (45) आणि नताली स्कीवर (51) यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. तर तळाच्या कॅथेरिन ब्रंट (34), जेनी गन (25) आणि लॉरा मार्श (14) यांनी इंग्लंडच्या डावात उपयुक्त योगदान दिले. पण अपेक्षित धावगती राखता न आल्याने त्यांना 50 षटकात सात बाद 228 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून . झुलन गोस्वामीने 3, पूनम यादवने 2 आणि राजेश्वरी गायकवाडने 1 बळी टिपला.