विज्क आन जी : विश्वनाथन आनंदला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या ११ व्या फेरीत पोलंडच्या जॉन किर्जिस्तोफविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. या निकालामुळे आनंदची चौथ्या स्थानी घसरण झाली. विदित गुजरातीने अजरबैजानच्या तिसऱ्या मानांकित शखरियार मोमेदियारोव्हचा पराभव करीत आशा कायम राखली.आनंद पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना विजय मिळवण्यात अपयशी ठरला. आनंदच्या खात्यावर ६.५ अंकांची नोंद आहे. त्याला आशा कायम राखण्यासाठी चीनच्या डिंग लिरेन व गुजराती या दोघांविरुद्धही निर्णायक विजय मिळवावा लागेल. गुजरातीने यापूर्वीच्या फेरीत रशियाचा ब्लादिमिर क्रामनिकचा पराभव केला होता तर आता मामेदियारोव्हला पराभूत केले. नार्वेच्या मॅग्नस कार्लसनने अजरबैजानच्या तैमूर रादजाबोवला बरोबरीत रोखले तर नेदरलँडच्या अनिश गिरीने अमेरिकेच्या सॅम्युअल शाकलँडचा पराभव केला. दोघेही संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे. तिसºया स्थानी रशियाचा इयान नेपोंनियाश्ची आहे. आनंद, लिरेन व गुजराती संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत. (वृत्तसंस्था)
विश्वनाथन आनंद-किर्जिस्तोफ लढत अनिर्णीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 4:34 AM