शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

जर्मनी, कोस्टारिका प्रशिक्षकांची ‘फातोर्डा’ला भेट

By admin | Published: July 10, 2017 1:19 AM

भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे.

मडगाव : भारतात पहिल्यांदाच होणाऱ्या फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या तयारीला आता वेग आला आहे. स्टेडियम आणि साधनसुविधांच्या पूर्वतयारीचा फिफा अधिकारी तसेच जर्मनी, कोस्टारिका आणि गिनी संघांच्या प्रशिक्षकांनी आढावा घेतला. त्यांनी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमला भेट दिली. गिनी संघातर्फे सोलियामाने कामारा, फाह कोंदे, जर्मनी संघातर्फे मार्क फिश्चर, मार्कुस शेर्इंनवशि, प्रशिक्षक ख्रिस्तीयान व्युयेका तर कोस्टारिकाचे प्रशिक्षक ब्राइंन्से कामाचो व ख्रिस्तियान सालेस उपस्थित होते. इराणचा संघ एएफसी स्पर्धेतील सामने खेळत असल्याने त्यांचे पदाधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत. येथील सुविधा समाधानकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्लेयर्स रूम, रेफ्री रुम, सामन्याच्या वेळील मैदान प्रवेशाची दिशा, आपत्कालीन सुविधा तसेच इतर सुविधांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. फिफाच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, स्टेडियम सज्ज करण्यात येत आहे.दरम्यान, फातोर्डा स्टेडियमवर ७ आॅक्टोबर रोजी जर्मनी-कोस्टारिका यांच्यात सायंकाळी ५ वाजता पहिला सामना, त्यानंतर रात्री ८ वाजता इराण वि. गिनी यांच्यात दुसरा सामना होईल. त्यानंतर १०, १३, १७ आॅक्टोबर रोजी सामने होतील. २१ आॅक्टोबर रोजी उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. मैदानावर ‘क’ गटातील सामने खेळविण्यात येतील. या गटात इराण , गिनी, जर्मनी आणि कोस्टारिका हे संघ आहेत. (वृत्तसंस्था)