लंडन : माजी जगज्जेता विश्वनाथ आनंद याने चौथ्या फेरीत पराभव स्वीकारल्यानंतर अखेर बुल्गारियाच्या वेसलीन टोपालोव याला नमवित स्पर्धेत पुनरागमन केले. गेल्या लढतीत आनंदला अमेरिकेच्या रिकारु नाकामूरा याने पराभूत केले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या लढतीत आनंदने टोपालोव याला ७४ चालींमध्ये नमविले. इतर चारही लढती बरोबरीत सुटल्या. आर्मोनियाचा लेवोन अरोनियन व विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन, तर नाकामूरा व इंग्लंडच्या मायकल अॅडम्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. फ्रान्सचा वाचियेर लाग्रेवने आणि नेदरलँडच्या अनीष गिरी, तर अमेरिकाच्या फाबियानो कारुआना व रशियाच्या एलेक्सांद्र ग्रिश्चुक यांच्यातील सामनादेखील बरोबरीत सुटला. स्पर्धेतील केवळ चार फेऱ्या शिल्लक असून गिरी, वाचियेर, लाग्रेव व नाकामूरा तीन अंकांसह अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर आनंद, कार्लसन, कारुआना, ग्रिश्चुक, अॅडम्स व अरोनियन यांचा क्रमांक लागतो. या सर्वांचे अडीच गुण असून, टोपालोव एका गुणासह शेवटच्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)
विश्वनाथन आनंद विजयी
By admin | Published: December 10, 2015 12:40 AM