शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वानखेडेवर आज सलामीचा थरार

By admin | Published: April 09, 2016 2:58 AM

इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील सलामीच्या सामन्याच्या आयोजनासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर वानखेडे स्टेडियम शनिवारी होणाऱ्या लढतीसाठी सज्ज झाले आहे

महाराष्ट्र डर्बी : मुंबई इंडियन्स वि. राइजिंग पुणे सुपरजायंट्स अशी लढतमुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील सलामीच्या सामन्याच्या आयोजनासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर वानखेडे स्टेडियम शनिवारी होणाऱ्या लढतीसाठी सज्ज झाले आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि नव्यानेच स्पर्धेत खेळत असलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंटस् यांच्यातील लढतीने आयपीएलच्या नवव्या सत्राचे बिगुल वाजेल.आयपीएल स्पर्धा इतिहासातील माजी विजेते आणि बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर लादलेल्या दोन वर्षांच्या बंदीनंतर राइजिंग पुणे सुपरजायंटस् आणि गुजरात लायन्स या दोन संघांची स्पर्धेत एन्ट्री झाली. पुणेकरांकडे आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाच्या प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आहेत. तर दुसरीकडे यजमान व गतविजेत्या मुंबई इंडियन्सची धुरा धडाकेबाज रोहित शर्माकडे असून आॅस्टे्रलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंंग संघाच्या प्रशिक्षकपदी आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत घरचे मैदान मुंबई इंडियन्सचा मजबूत बालेकिल्ला राहिला असून, पुणेकरांना आपल्या पहिल्या विजयासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. गतवर्षी विजेते ठरलेल्या मुंबईच्या यशात वेस्ट इंडीजच्या लिंडेल सिमन्सचा वाटा मोलाचा ठरला होता. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही त्याने वानखेडे स्टेडियमवर धुवाधार खेळी करून यजमान भारताविरुद्ध विंडीजला विजयी करून संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला होता. त्याचबरोबर कर्णधार रोहितची आक्रमक फटकेबाजी मुंबईसाठी निर्णायक ठरेल. शिवाय अंबाती रायडू, जोस बटलर आणि कोरी अँडरसन, केरॉन पोलार्ड व हार्दिक पांड्या अशा तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश मुंबई संघात असल्याने प्रतिस्पर्धी संघापुढे मोठे आव्हान असेल. गोलंदाजीत स्पर्धेआधीच मुंबईला मोठा धक्का बसला असून, संघाचा मुख्य गोलंदाज गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या पाच सामन्यांत खेळू शकणार नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह, अँडरसन, टीम साऊदी, मिशेल मॅकलेनघन आणि मर्चेंट डी लांगे यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. तर फिरकीमध्ये हरभजन सिंगवर संघाची मदार राहील. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राइजिंग पुणे सुपराजायंटस्चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा संघाचा हुकमी एक्का आहे. शिवाय अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्शल आणि फाफ डू प्लेसिस अशा तगड्या खेळाडूंची फौजही त्यांच्याकडे आहे. एल्बी मॉर्कल आणि इरफान पठाण हे अष्टपैलू कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्यास सक्षम आहेत. तर गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा आणि जादुई फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मुंबईला कोंडित पकडू शकतात. आॅस्टे्रलियाचा नवखा फिरकीपटू अ‍ॅडम जंपाही पुणे संघात असून त्याची साथ अश्विनला मिळेल.> संघ यातून निवडणारमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लिंडेल सिमंस, पार्थिव पटेल, केरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, हार्दिक पांड्या, हरभजन सिंग, कोरी अँडरसन, मिशेल मॅक्लीनघन, जोस बटलर, उन्मुक्त चंद, मर्चेंट डि लांगे, सिद्धेश लाड, जसप्रीत बुमरा, श्रेयस गोपाल, टिम साउदी, जगदीशा सुचित, आर विनय कुमार, कृणाल पंड्या, नत्थु सिंह, अक्षय वखारे, नितिश राणा, जितेश शर्मा, किशोर कामथ आणि दीपक पूनिया.राइजिंग पुणे सुपरजायंट्स :महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केविन पीटरसन, फाफ डु प्लेसिस, स्टीव स्मिथ, मिशेल मार्श, जसकरण सिंह, आर अश्विन, अंकित शर्मा, एल्बी मॉर्कल, इरफान पठान, ईशांत शर्मा, ईश्वर पांडे, तिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर पी सिंह, रजत भाटिया, अंकुश बैंस , बाबा अपराजित, मुरुगन अश्विन, अशोक डिंडा, दीपक चहार, स्काट बोलैंड, पीटर हैंड्सकाम्ब, अ‍ॅडम जंपा. आतापर्यंतचे विजेते...२००८ - राजस्थान रॉयल्स२००९ - डेक्कन चार्जर्स२०१० - चेन्नई सुपरकिंग्ज२०११ - चेन्नई सुपरकिंग्ज२०१२ - कोलकाता नाइट रायडर्स२०१३ - मुंबई इंडियन्स२०१४ - कोलकाता नाइट रायडर्स २०१५ - मुंबई इंडियन्स> धोनी, रहाणेने केले पुणे संघाच्या जर्सीचे अनावरणमुंबई : कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे यांच्या उपस्थितीत नवीन संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. निळा, गुलाबी आणि नारंगी रंगांच्या या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी कॅप्टन कुल धोनी म्हणाला की, ‘आरपीएस’कडून आम्ही गल्फ आॅईल इंडिया लिमिटेडचे स्वागत करतो. खेळात या समूहाचे मोठे योगदान आहे. प्रायोजकांंनी चेन्नईनंतर पुणे संघावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. आता आमची जबाबदारी आहे की, आम्ही या सत्रात चांगला खेळ करू.’> आकडेवारी....सुरेश रैना (चेन्नई व गुजरात) सर्वाधिक धावा ३६९९१३२ सामने १२८ डाव > लसिथ मलिंगा (मुंबई)सर्वाधिक बळी १४३९८ सामने ९८ डाव> गौतम गंभीर (दिल्ली, कोलकाता)सर्वाधिक अर्धशतके २६११७ सामने ११६ डाव> ख्रिस गेल (कोलकाता व बंगळुरू)सर्वाधिक शतके ०५८२ सामने ८१ डाव>>> इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) वेळापत्रक -क्र.दिनांक संघ वेळ स्टेडियम १)०९ एप्रिल मुंबई इंडियन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स रात्री ८ वा. वानखेडे, मुंबई२)१० एप्रिल कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्सरात्री ८ वा. ईडन गार्डन्स, कोलकाता३)११ एप्रिलकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. गुजरात लायन्सरात्री ८ वा.पीसीए, मोहाली४)१२ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. सनरायझर्स हैैदराबादरात्री ८ वा. एम. चिन्नास्वामी, बंगळुरू५) १३ एप्रिलकोलकाता नाइट रायडर्स वि. मुंबई इंडियन्सरात्री ८ वा.ईडन गार्डन्स, कोलकाता६) १४ एप्रिलगुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्सरात्री ८ वा.एससीए, राजकोट७) १५ एप्रिलदिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाबरात्री ८ वा.फिरोजशहा कोटला, दिल्ली८) १६ एप्रिलसनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स सायं. ४ वा. राजीव गांधी, हैदराबाद९) १६ एप्रिलमुंबई इंडियन्स वि. गुजरात लायन्सरात्री ८ वा.वानखेडे, मुंबई१०)१७ एप्रिलकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्ससायं. ४ वा. पीसीए, मोहाली११)१७ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्सरात्री ८ वा.एम. चिन्नास्वामी, बंगळुरू१२) १८ एप्रिलसनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स रात्री ८ वा.राजीव गांधी, हैदराबाद१३)१९ एप्रिलकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाइट रायडर्सरात्री ८ वा.पीसीए, मोहाली१४)२० एप्रिलमुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोररात्री ८ वा.वानखेडे, मुंबई १५) २१ एप्रिलगुजरात लायन्स वि. सनरायझर्स हैदराबाद रात्री ८ वा.एससीए, राजकोट १६)२२ एप्रिल रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोररात्री ८ वा.एमसीए, पुणे १७) २३ एप्रिलदिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स सायं. ४ वा. फिरोजशहा कोटला, दिल्ली१८) २३ एप्रिल सनरायझर्स हैैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाबरात्री ८ वा.राजीव गांधी, हैैदराबाद१९)२४ एप्रिलगुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसायं. ४ वा. एससीए, राजकोट२०) २४ एप्रिलरायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. कोलकाता ना. रायडर्सरात्री ८ वा.एमसीए, पुणे २१)२५ एप्रिलकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्सरात्री ८ वा.पीसीए, मोहाली२२) २६ एप्रिलसनरायझर्स हैैदराबाद वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्सरात्री ८ वा.राजीव गांधी, हैैदराबाद२३) २७ एप्रिलदिल्ली डेअरडेव्हिल्स वि. गुजरात लायन्सरात्री ८ वा.फिरोजशहा कोटला, दिल्ली२४) २८ एप्रिलमुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्सरात्री ८ वा.वानखेडे, मुंबई२५)२९ एप्रिलरायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. गुजरात लायन्सरात्री ८ वा.एमसीए, पुणे२६) ३० एप्रिलदिल्ली डेअरव्हिल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स सायं. ४ वा. फिरोजशहा कोटला, दिल्ली२७) ३० एप्रिल सनरायझर्स हैैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोररात्री ८ वा.राजीव गांधी, हैैदराबाद २८) १ मे गुजरात लायन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाबसायं. ४ वा. एससीए, राजकोट२९) १ मे रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्सरात्री ८ वा.एमसीए, पुणे ३०) २ मे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. कोलकाता नाइट रायडर्सरात्री ८ वा.एम. चिन्नास्वामी, बंगळुरू३१)३ मेगुजरात लायन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्सरात्री ८ वा.एससीए, राजकोट३२)४ मे कोलकाता नाइट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाबरात्री ८ वा.ईडन गार्डन्स, कोलकाता३३)५ मेदिल्ली डेअरडेव्हिल्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्सरात्री ८ वा.फिरोजशहा कोटला, दिल्ली३४)६ मेसनरायझर्स हैैदराबाद वि. गुजरात लायन्सरात्री ८ वा.राजीव गांधी, हैैदराबाद३५) ७ मे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्ससायं. ४ वा. एम. चिन्नास्वामी, बंगळुरू३६) ७ मेकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्सरात्री ८ वा.व्हीसीए, नागपूर३७) ८ मेमुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैैदराबादसायं. ४ वा. वानखडे, मुंबई३८) ८ मे कोलकाता नाइट रायडर्स वि. गुजरात लायन्सरात्री ८ वा.ईडन गार्डन्स, कोलकाता३९)९ मे किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोररात्री ८ वा.व्हीसीए, नागपूर४०) १० मे रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैैदराबादरात्री ८ वा.एमसीए, पुणे४१) ११ मेरॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. मुंबई इंडियन्सरात्री ८ वा.एम. चिन्नास्वामी, बंगळुरू४२)१२ मेसनरायझर्स हैैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्सरात्री ८ वा.राजीव गांधी, हैैदराबाद ४३) १३ मेमुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाबरात्री ८ वा.वानखेडे, मुंबई४४) १४ मे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. गुजरात लायन्स सायं. ४ वा. एम. चिन्नास्वामी, बंगळुरू४५)१४ मेकोलकाता नाइट रायडर्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्सरात्री ८ वा.ईडन गार्डन्स, कोलकाता४६)१५ मेमुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्ससायं. ४ वा. वानखेडे, मुंबई४७) १५ मेकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैैदराबादरात्री ८ वा.व्हीसीए, नागपूर४८)१६ मेकोलकाता नाइट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोररात्री ८ वा.ईडन गार्डन्स, कोलकाता४९)१७ मे रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्सरात्री ८ वा.एमसीए, पुणे५०) १८ मे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. किंग्ज इलेव्हन पंजाबरात्री ८ वा.एम. चिन्नास्वामी, बंगळुरू५१)१९ मे गुजरात लायन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स रात्री ८ वा.टीबीसी५२)२० मे दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. सनरायझर्स हैैदराबादरात्री ८ वा.शहीद नारायण सिंह, रायपूर५३) २१ मेरायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. किंग्स इलेव्हन पंजाबसायं. ४ वा. एमसीए, पुणे ५४) २१ मे गुजरात लायन्स वि. मुंबई इंडियन्स रात्री ८ वा.टीबीसी५५)२२ मे कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैैदराबाद सायं. ४ वा. ईडन गार्डन्स, कोलकाता५६) २२ मेदिल्ली डेअरडेव्हिल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोररात्री ८ वा.शहीद नारायण सिंह, रायपूर५७) २४ मे क्वॉलिफायर १ - रात्री ८ वा.एम. चिन्नास्वामी, बंगळुरू५८)२५ मेएलीमिनेटर - रात्री ८ वा.एमसीए, पुणे५९) २७ मेक्वॉलिफायर-२ रात्री ८ वा.एमसीए, पुणे६०) २९ मे फायनल रात्री ८ वा.वानखेडे, मुंबई