शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

वानखेडेवर आज काँटे की टक्कर...

By admin | Published: May 10, 2015 4:30 AM

सलग ५ विजय मिळवून तुफान फॉर्ममध्ये आलेले मुंबई इंडियन्स आज आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर तडाखेबंद रॉयल चँलेंजर्स बंगळुरूविरुद्ध भिडेल.

मुंबई : सलग ५ विजय मिळवून तुफान फॉर्ममध्ये आलेले मुंबई इंडियन्स आज आपल्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर तडाखेबंद रॉयल चँलेंजर्स बंगळुरूविरुद्ध भिडेल. स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय अनिवार्य असल्याने या वेळी क्रिकेटप्रेमींना काँटे की टक्कर पाहायला मिळेल. मुंबईने शुक्रवारी बलाढ्य चेन्नईला धक्का देऊन चांगली लय मिळवली आहे. विशेष म्हणजे, हुकमी लसिथ मलिंगा संघाबाहेर असतानादेखील मुंबईने चेन्नईला मर्यादेत रोखण्याची कामगिरी केली होती. आजच्या बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मलिंगाचे पुनरागमन जवळ जवळ निश्चित असून चेन्नईविरुद्ध त्याच्या जागी खेळलेल्या मर्चंट डी लांगेला बाहेर बसावे लागेल.फलंदाजीमध्ये मुंबईची स्थिती मजबूत दिसते. संघाचे दोन्ही सलामीवीर लेंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्यांची आक्रमक सुरुवात मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. शिवाय, कर्णधार रोहित शर्मा, अंबाती रायडू आणि किरॉन पोलार्ड यांची आक्रमकतादेखील प्रतिस्पर्ध्यांच्या चिंधड्या उडवण्याची क्षमता राखून आहे. गोलंदाजीमध्ये मलिंगा आणि हरभजन यांच्याव्यतिरिक्त इतरांना म्हणावा तसा प्रभाव टाकण्यात अपयश आले. विनयकुमार, जगदीश सुचित आणि मिचेल मॅक्लेनघन यांच्यासमोर कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान असेल.दुसऱ्या बाजूला बंगळूरूचा हुकमी गोलंदाज मिचेल स्टार्क जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यंदा सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकल्यानंतरही त्याने ७ सामन्यांत १६ बळी घेऊन आपली छाप पाडली. शिवाय, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेव्हीड वाइस (१० बळी) व फिरकीपटू युजवेंद्र चहल (१३ बळी) यांची कामगिरीदेखील बंगळुरूसाठी निर्णायक ठरत आहे.फलंदाजीत आरसीबीचा आधारस्तंभ धडाकेबाज ख्रिस गेल हाच आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या गतसामन्यात गेलने वादळी ११७ धावांची खेळी साकारताना प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशाराच दिला. त्याच वेळी कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हीलियर्स यांच्यावरदेखील संघाची मदार असेल. या तिघांनीही यंदाच्या सत्रात ३०० हून अधिक धावा कुटल्या आहेत. मात्र, हे तिघेही लवकर बाद झाल्यास बंगळुरूची फलंदाजी ढेपाळते, हे प्रतिस्पर्ध्यांना चांगले ठाऊक असल्याने मुंबईचे प्रथम लक्ष्य या त्रयीला रोखण्याचेच असेल. (वृत्तसंस्था)