ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. ४ - वकार युनुस यांनी सोमवारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. काल शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. टी-२० वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या सुमार कामगिरीसाठी दोघांना राजीनामा द्यावा लागला आहे.
पाकिस्तानला बांगलादेश वगळता भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव स्वीकारवा लागला होता. भारताकडून पराभव झाल्यानंतर दोघांच्या राजीनाम्याची मागणी सुरु झाली होती. मी जड अंतकरणाने माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे वकारने लाहोर येथे पत्रकारांना सांगितले.
४४ वर्षीय वकार यांनी २०१४ मध्ये दुस-यांदा पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळली होती. त्यापूर्वी २०१०-११ मध्ये ते पाकिस्तानचे प्रशिक्षक होते.