गुवाहाटी : येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या इंडिया ओपन बॉक्सिंग स्पर्धेच्या दुसºया टप्प्याच्या स्पर्धेत सर्वांचे लक्ष असणार ते सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एम.सी. मेरिकोम हिच्यावर. या स्पर्धेत ७२ भारतीय आणि १६ देशांतील २०० मुष्ट्यिोद्धे सहभागी होतील. आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन अमित पंघाल व जागतिक स्पर्धेत कांस्य पदकप्राप्त शिव थापा हेही आपला कस पणाला लावतील. रशियात विश्व चॅम्पियनशिप स्पर्धा होत असून ही स्पर्धा आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा असल्यामुळे गुवाहाटीत होेणाºया स्पर्धेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मेरिकोमने विश्व चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी गत महिन्यात आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मेरिकोम ७०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या या पाचदिवसीय स्पर्धेत घरच्या प्रेक्षकांसमोर ५१ किलो वजन गटातील स्पर्धेत पदार्पण करेल. तिने २०१८ मध्ये इंडिया ओपनच्या पहिल्या स्पर्धेत ४८ किलो वजन गटात सुवर्ण पटकावले होते. ती म्हणाली, ‘मला या स्पर्धेतून खूप आशा आहेत. गेल्या काही महिन्यांत ५१ किलोमध्ये कठोर सराव केल्याने आत्मविश्वास उंचावला आहे. गुवाहाटी मला घरासारखेच आहे आणि सर्वच भारतीय खेळाडूंना येथे खूप पाठिंबा मिळेल.’
अमित पंघाल (५२ किलो) आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुन्हा आपले वर्चस्व राखण्यास उत्सुक असेल. आसामचा शिव थापा (६० किलो) घरच्या पाठीराख्यांना प्रभावित करेल. अशीच अपेक्षा २०१७ मधील युवा विश्व चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक प्राप्त अनुकुशिता बोरो (६४) याच्याकडून असेल. २०१७ मध्ये जागतिक कांस्यपदक जिंकणारा गौरव बिधुडी (५६) याच्याकडूनदेखील भारताला अशा असेल.