नवी दिल्ली : आॅलिम्पिकच्या मिश्र दुहेरीत सहभागी न होऊ शकल्याचे शल्य अजूनही मनात कायम ठेवणारा अनुभवी भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेस याने रिओ आॅलिम्पिक आणि त्याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये आम्ही आमचा सर्वोत्तम संघ खेळवला नसल्याचे मत व्यक्त केले आहे.पेसने शनिवारी येथे साकेत मिनेनीच्या साथीने डेव्हिस कपच्या दुहेरी लढतीत स्पेनचे राफेल नदाल आणि मार्क लोपेजविरुद्ध पराभवानंतर पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘रिओ आॅलिम्पिक आणि त्याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये आम्ही आमचा संघ उतरवला नाही असे मी स्पष्पटणे म्हणू शकतो. रिओत मिश्र दुहेरीत आम्हाला पदक जिंकण्याची सुरेख संधी होती. एका खेळाडूला १४ महिन्यांत ४ ग्रँडस्लॅम जिंकण्यापेक्षा आणखी काय करायला हवे.’ब्राझीलच्या रिओ डी जेनेरोत ५ ते २१ आॅगस्टदरम्यान झालेल्या आॅलिम्पिकच्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना हे मिश्र दुहेरीत खेळले होते; परंतु या जोडीला उपांत्य फेरी आणि त्यानंतर कास्यपदकाच्या प्लेआॅफमध्येही पराभव पत्करावा लागला होता. पेसने आपण साकेतसोबत दुहेरीत खेळणे पसंत करू शकतो, असेही म्हटले.
‘दोन आॅलिम्पिकमध्ये आम्ही सर्वोत्तम संघ पाठवला नाही’
By admin | Published: September 19, 2016 4:07 AM