मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सराव सामना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. वैयक्तिकरीत्या या सामन्यातून मी खूप काही शिकलो. मी जवळपास १५-१६ षटकांपर्यंत फलंदाजी केली. त्यामुळे आगामी सामन्यांआधी मला चांगल्या कामगिरीचा आत्मविश्वास मिळाला, असे वक्तव्य भारताचा सलामीवीर शिखर धवन याने केले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात १९७ धावांचा पाठलाग करताना धवनने ५३ चेंडंूत ७३ धावांची शानदार नाबाद खेळी केली. या सामन्यात धवनने इतर फलंदाजांना संधी मिळावी म्हणून निवृत्त होऊन मैदान सोडले. मात्र, धवनच्या खेळीनंतरही टीम इंडियाला ४ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला.या खेळीनंतर धवनने सांगितले, की या सामन्यातून खूप शिकण्यास मिळाले. या खेळीमुळे मी अधिक समजूतदार झालो आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना लवकर विकेट गेल्या. यानंतरही एक चांगली भागीदारी झाली आणि आम्ही विजयानजीक पोहोचलो. घरच्या मैदानावर खेळत असल्याने चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे नेहमीच असते.
सराव सामन्यात खूप काही शिकलो
By admin | Published: March 13, 2016 11:19 PM