कोलकाता : ‘अंडरडॉग’ असल्याचा आम्हाला आयसीसी विश्व टी-२० स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचा लाभ मिळेल, असे मत पाकचा अष्टपैलू शोएब मलिकने व्यक्त केले. पाकिस्तानने १९९२ मध्ये वन-डे विश्वकप आणि २००९ मध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी रविवारी आयोजित ओपन मीडिया सत्रात बोलताना मलिक म्हणाला,‘आम्ही ‘अंडरडॉग’ आहोत, हे आमच्यासाठी चांगले आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. आम्ही येथे चमकदार कामगिरी करण्यासाठी आलेलो आहोत.’मलिक पुढे म्हणाला,‘आशिया कप स्पर्धेत आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही; पण आता हा भूतकाळ झाला आहे. आम्ही येथे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आलेलो आहोत.’ मलिकने सांगितले की,‘पाकिस्तानमधील लीगला अन्य देशांच्या लीग स्पर्धांसोबत बरोबरी साधण्यासाठी थोडा वेळ लागेल. भारतातील यशस्वी खेळाडू रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली यांचा विचार केला, तर आयपीएलमुळे त्यांच्या खेळामध्ये कमालीची सुधारणा झाली.’ आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध विजय मिळवण्याचे चक्र भेदण्याबाबत बोलताना मलिक म्हणाला,‘ही कठीण बाब आहे. मीडिया या सामन्याबाबत हाइप करीत आहे. या लढतीच्या निमित्ताने युवा खेळाडूंना आपला दर्जा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. दडपण न बाळगता सर्वोत्तम कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळवण्याचे लक्ष्य असायला हवे.’ (वृत्तसंस्था)> ... पण पाक संघ सकारात्मक : आफ्रिदीपाकिस्तान संघासाठी विश्व टी-२० स्पर्धेची तयारी अनुकूल नव्हती; पण संघ सकारात्मक विचाराने भारतात दाखल झाला आहे, असे मत पाक संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने व्यक्त केले. पाकला गेल्या महिन्यात आशिया कप स्पर्धेत केवळ दोन विजय मिळवता आले. त्याआधी, न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आफ्रिदी म्हणाला,‘आम्हाला योजनाबद्ध खेळ करण्यात अपयश आले. त्यामुळे विश्वकप स्पर्धेत बांगलादेश (१६ मार्च) आणि भारत (१९ मार्च) यांच्याविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. यापूर्वीच्या मालिकांमध्ये आम्हाला योजनाबद्ध खेळ करता आला नाही. रणनीतीनुसार खेळ केला तर कामगिरी चांगली होते. सलामी लढत नेहमी महत्त्वाची असते. पहिल्या लढतीत सूर गवसणे आवश्यक असते. खेळपट्टी व परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल आहे. दोन्ही लढती आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.’च्पाकिस्तानची ईडन गार्डनवरील कामगिरी उल्लेखनीय आहे. पाकने भारताविरुद्ध येथे चारही वन-डे सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आकडेवारीचा विचार करता आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे, असेही आफ्रिदी म्हणाला. > धोनी माझा आदर्श : सरफराजकोलकाता : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज सरफराज अहमद क्रिकेटर म्हणून महेंद्रसिंह धोनीला आदर्श मानतो. भारतीय कर्णधाराप्रमाणे फिनिशरची भूमिका बजावणे आवडेल, असे सरफराजने म्हटले आहे. सरफराज म्हणाला,‘मी धोनीचे अनेक बाबतीत अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. धोनीकडून बरेच काही शिकण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी धोनीला आदर्श मानतो. त्याच्याप्रमाणे सामना फिनिश करण्यासाठी प्रयत्न राहील. फलंदाजी व यष्टिरक्षणामध्ये छाप सोडणारा सरफराज भारताचा स्टार कर्णधार धोनीप्रमाणे उपयुक्त खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवण्यास उत्सुक आहे. ’पाकचा अंडर-१९ विश्वकप विजेत्या संघाचा कर्णधार म्हणाला,‘भारतात दाखल होण्याचा आनंद आहे. संघाच्या गरजेनुसार खेळण्यासाठी सज्ज आहे.’दरम्यान, सरफराजने आशिया कप स्पर्धेतील संघाच्या अपयशासाठी निराशा व्यक्त केली. उणिवा दूर करीत विश्व टी-२० स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याची आशा आहे.
आम्ही ‘अंडरडॉग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 12:57 AM