टोकियो : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) आगामी ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाला मान्यता द्यायची किंवा कोणत्या खेळाची मान्यता रद्द करायची याबाबत अधिक अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे आता डोपिंगच्या कचाट्यात सापडलेल्या भारोत्तोलनासारख्या खेळांचे स्थान धोक्यात आले असून, पॅरिस येथे होणाऱ्या २०२४ सालच्या ऑलिम्पिकमध्ये या खेळाची मान्यता रद्द झाल्यास भारताच्या मीराबाई चानूच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा संपुष्टात येऊ शकतात.मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला रौप्यपदकाद्वारे पदकाची कमाई करून दिली होती. भारोत्तोलनामध्ये रौप्य पटकावणारी ती पहिली भारतीयही ठरली. मात्र, यानंतर तिने पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावण्याचा निर्धारही केला.भारोत्तोलनासह बॉक्सिंग खेळाची संचालन व्यवस्था वादात अडकले आहेत. शिवाय भारोत्तोलनामध्ये डोपिंगचे प्रमाण अधिक असल्याने हा खेळ डागाळलेलाही आहे. त्यामुळेच पुढील पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनावर निलंबनाची टांगती तलवार आली आहे. नियमानुसार जर एखादा खेळाचे आयओसी कार्यकारी बोर्डाच्या नियमांनुसार पालन होत नसेल तर आयओसी त्या खेळाला ऑलिम्पिक कार्यक्रमातून हटवू शकते. त्यामुळेच आता भारोत्तोलन आणि बॉक्सिंग यांच्याशी जुळलेल्या मुद्यांकडे पाहता आयओसी सदस्यांनी मतदानाद्वारे एखाद्या खेळाला ऑलिम्पिकबाहेर करण्याचे अधिकार दिले आहेत.
...तर मीराबाई चानूच्या स्वप्नांना मोठा धक्का; आयओसी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 5:45 AM