मुंबई : स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड महिला संघ गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्यात लढवय्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हात करेल. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघ कागदावर विंडीजविरुद्ध मजबूत दिसत असला तरी, प्रत्यक्षात मैदानात कोणत्याही संघाला धक्का देण्याची क्षमता राखून असलेल्या विंडीजविरुद्ध गाफील राहण्याची चूक महागात पडू शकते. २००९, २०१०मध्ये उपविजेतेपदावर राहिलेल्या किवी संघाने या वेळी विजेतेपदाचा निर्धार केला असून सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळ करताना त्यांनी सर्वच प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.न्यूझीलंड : सूजी बेट्स (कर्णधार), सोफी डेवाइन, एरिन बर्मिंघम, लेघ कास्पेरेक, फेलिसिटी लेडन डेविस, सारा मॅग्लॅशन, केटी मार्टिन, टी. न्यूटन, मोर्ना नीलसन, कैटी पर्किंस, अन्ना पीटरसन, रसेल प्रिन्स्ट, हन्ना रोवे, एमी सार्टेथवेट आणि ली तहाहू.वेस्ट इंडिज : स्टेफनी टेलर (कर्णधार), शकिरा सलमान, मारिसा एगिलीरा, शैमाइन कॅम्पबेल, शमीना कोनेल, ब्रिटनी कूपर, डिएंट्रा डोटिन, एफी फ्लेचर, स्टासी एन. किंग, कीसीया नाइट, किशोना नाइट, हेले मॅथ्यूज, अनीसा मोहम्मद, शकाना किंटीन आणि टे्रमेन स्मार्ट. सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.
न्यूझीलंडसमोर विंडीजचे आव्हान
By admin | Published: March 31, 2016 3:14 AM