शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत

By admin | Published: March 26, 2016 2:21 AM

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत माजी विजेत्या वेस्ट इंडिजने बलाढ्य द. आफ्रिकेला तीन गड्यांनी पराभूत करीत शुक्रवारी टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.

- किशोर बागडे,  नागपूरअखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत माजी विजेत्या वेस्ट इंडिजने बलाढ्य द. आफ्रिकेला तीन गड्यांनी पराभूत करीत शुक्रवारी टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. उत्कृष्ट गोलंदाजी आणि शानदार क्षेत्ररक्षणाच्या बळावर द. आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १२२ धावांवर रोखल्यानंतर वेस्ट इंडिजने विजयी लक्ष्य १९.४ षटकांत ७ बाद १२३ धावा करीत गाठले.व्हीसीएच्या जामठास्थित खेळपट्टीवर विजयाचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचीही सुरुवातीला दमछाक झाली. ख्रिस गेल (४) आणि फ्लेचर(११) लवकर बाद होताच विंडीजची स्थिती २ बाद ३४ होती. मर्लोन सॅम्युअल्सने चिवट खेळी करीत सहा चौकारांसह ४४ चेंडूत सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले. सलामीवीर जॉन्सन चार्ल्सने दोन चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या. विंडीजने १६ षटकांत ४ बाद ९९ धावा केल्या होत्या. १७ व्या षटकांत फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने सलग दोन चेंडूवर रसेल आणि कर्णधार सॅमी यांना बाद करीत आणखी चुरस निर्माण केली. पुढच्या षटकांत केवळ तीन धावा निघाल्याने विंडीजच्या गोटात खळबळ माजली. अखेरच्या दोन षटकांत २० धावांची गरज होती आणि सॅम्युअल्स खेळपट्टीवर होता. त्याने थर्डमॅनला दोन चौकार ठोकून सामना संपविण्याकडे वाटचाल केली. त्याच षटकांत डिव्हिलियर्सने त्याचा झेल टिपला. अखेरच्या षटकात विंडीजला नऊ धावांचे आव्हान होते. रबाडाचा पहिला चेंडू ब्रेथवेटला निर्धावखेळला. पुढच्या चेंडूवर त्याने षटकार खेचला. रबाडाने पुढचा चेंडू वाईड टाकल्यानंतर ब्रेथवेटने एक धाव घेतली. स्ट्राईक रामदीनकडे आला. त्याने मारलेला चेंडू अमलाच्या हाताला चाटून जाताच विंडीजचा विजय साकार झाला. द. आफ्रिकेकडून ताहिरने दोन गडी बाद केले. याआधी आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, आणि ख्रिस गेल यांची अप्रतीम गोलंदाजी तसेच साजेशा सुरेख क्षेत्ररक्षणाच्या बळावर वेस्ट इंडिजने द. आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १२२ धावांत सहज रोखले.सलामीवीर क्वींटन डिकॉकने ४६ चेंडूत सर्वाधिक ४७ धावांचे योगदान दिले. तीन चौकार आणि एक षटकार खेचणाऱ्या डीकॉकने सहाव्या गड्यासाठी डेव्हिड व्हिसेसोबत सहाव्या गड्यासाठी ७.२ षटकांत अर्धशतकी भागीदारी करीत आफ्रिकेच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. १६ व्या षटकांत रसेलने त्याला त्रिफळाबाद केले. डेव्हिड व्हिसेने दोन चौकारांसह २६ चेंडूत २८ धावा केल्या. बोव्होच्या चेंडूवर कर्णधार सॅमीने त्याचा झेल टिपताच धावांचा वेग मंदावला. ग्रूप १ मध्ये विंडीजला चौथा सामना आधीच स्पर्धेबाहेर पडलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध रविवारी येथेच खेळायचा आहे. दुसरीकडे पराभवानंतर द. आफ्रिका संघ संकटात सापडला आहे. तीन सामन्यात दोन पराभव पचवावे लागणाऱ्या आफ्रिका संघाची श्रीलंकेविरुद्ध २८ मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात परीक्षा राहील. त्याआधी इंग्लंडने श्रीलंकेला आज शनिवारी होणाऱ्या सामन्यात नमविल्यास द. अफ्रिकेला घरचा रस्ता धरावा लागू शकतो.संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका : २० षटकांत ८ बाद १२२ धावा (क्विंटन डिकॉक ४७, डेव्हिड व्हिसे २८, ख्रिस्टोफर मॉरिस नाबाद १६; ख्रिस गेल ३-०-७-२, ड्वेन ब्राव्हो ४-०-२०-२, आंद्रे रसेल ४-०-२८-२) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १९.४ षटकांत ७ बाद १२३ धावा (मर्लोन सॅम्युअल्स ४३, जॉन्सन चार्ल्स ३२; इम्रान ताहिर ४-०-१३-२)