शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पश्चिम रेल्वेचे धमाकेदार विजेतेपद

By admin | Published: November 11, 2016 5:02 AM

बलाढ्य पश्चिम रेल्वे (मुंबई विभाग) संघाने आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर तुल्यबळ हरयाणा इलेव्हन संघाला ४-२ असे लोळवत ३३व्या सुरजीत हॉकी स्पर्धेच्या महिला गटाचे जेतेपद पटकावले.

जालंधर : बलाढ्य पश्चिम रेल्वे (मुंबई विभाग) संघाने आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर तुल्यबळ हरयाणा इलेव्हन संघाला ४-२ असे लोळवत ३३व्या सुरजीत हॉकी स्पर्धेच्या महिला गटाचे जेतेपद पटकावले. आॅलिम्पियन सुरजीत हॉकी स्टेडियमवर बुधवारी रात्री झालेल्या या सामन्यात पश्चिम रेल्वेच्या महिलांनी आक्रमक खेळ करताना हरयाणा संघावर जबरदस्त वर्चस्व राखले. या शानदार कामगिरीसह पश्चिम रेल्वेने एक लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह चषकावर कब्जा केला. तर, उपविजेत्या हरयाणाला चषकासह ७५ हजार रुपयांच्या पारितोषिकावर समाधान मानावे लागले.आक्रमक सुरुवात केलेल्या पश्चिम रेल्वेने पहिल्या सत्रात दबदबा राखला. १४व्याच मिनिटाला अनूपा बारला हिने अप्रतिम मैदानी गोल करुन रेल्वेला १-० अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यानंतर पुन्हा एकदा ३४व्या मिनिटाला अनूपाने हरयाणाच्या क्षेत्रात मुसंडी मारताना आणखी एक मैदानी गोल करुन संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. या दमदार दोन गोलांच्या जोरावर रेल्वेने मध्यंतराला एकहाती वर्चस्व राखले.विश्रांतीनंतर हरयाणाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. जसप्रीत कौरने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना ४०व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल साकारला. यानंतर दोन मिनिटांनी पश्चिम रेल्वेच्या मिअंगबम लिली चानू हिने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन संघाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. हरयाणा देखील सहजासहजी हार मानण्यास तयार नव्हते. ५०व्या मिनीटाला नेहाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन संघाची पिछाडी २-३ अशी कमी केली. यावेळी हरयाणा कडवी टक्कर देणार अशी शक्यता होती. परंतु, ६८व्या मिनिटाला रेल्वेच्या मनजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर वेगवान गोल करताना संघाच्या विजयावर ४-२ असा शिक्कामोर्तब केला. (वृत्तसंस्था)