ऑनलाइन लोकमतधर्मशाळा, दि. 26 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे धर्मशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली असली तरीही तो मैदानापासून दूर राहू शकला नाही. पहिल्या दिवशी तो ड्रिंक्सच्या निमित्तानं मैदानात उतरला. कोहलीच्या या स्पिरीटवर ब्रेटली, गावस्कर सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी स्तुतिसुमनं उधळली आहेत.चौथ्या कसोटीत समालोचन करताना सुनिल गावस्कर यांनी विराटला मैदानात पाणी घेऊन आल्याचे पाहाताच ते म्हणाले, बघा बघा भारतीय खेळाडूंसाठी पाणी घेऊन कोण आलंय? बारावा खेळाडू साक्षात विराट कोहली. गावस्करांच्या या वक्तव्यानंतर ब्रेट लीही विराट कोहली बद्दल बोलण्यास स्वतला रोखू शकला नाही, गावस्कारांचे वाक्या संपताच ब्रेटली म्हणतो अरे व्वा, जगातला सर्वात महागडा ड्रिंक्समन मैदानात उतरलेला दिसतोय. ब्रेट लीच्या या उद्गारानंतर सारा समालोचन कक्ष हास्यकल्लोळात बुडाला.आपल्या सहकाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी भारतीय कर्णधारानं स्वीकारलेल्या या भूमिकेचं स्टेडियममधल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केलं.
कोहलीने यावरून पुन्हा एकदा आपणच अव्वल असल्याचे सिद्ध केले. आपण खेळत नसलो तरी संघाला वेळोवेळी लागणारे सल्ले तसेच आपले योगदान देण्यामध्ये विराट अजिबात मागे नाही. यासाठीच जेव्हा ह्यड्रिंक्स ब्रेकह्ण झाला तेव्हा संघासाठी ड्रिंक्स घेऊन विराट कोहलीने मैदानात धाव घेतली. ड्रिंक्स ब्रेकचा फायदा घेत विराट कोहलीने अजिंक्य रहाणेला काही महत्त्वाचे सल्लेही दिले. यावरून विराट कोहलीची खेळभावना दिसत असून एक कर्णधार म्हणून तो किती योग्य आहे, हे सिद्ध झाले.