नवी दिल्ली : पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल होताच टेबलवरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडा नाराज दिसला. त्याने आपल्यासमोर कोकच्या बाटल्या हटवल्या, त्यावरुन सोशल मीडियावर भन्नाट मिम्सही व्हायरल झाले आहेत. आता, त्या बाटल्यांचा असाच एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रोनाल्डोने खुर्चीवर बसताच कोका कोलाच्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. तसेच, उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्लाही त्यानं दिला. कोका कोला हे युरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. रोनाल्डो कधीच सॉफ्ट ड्रींक्स घेत नाही किंवा त्याची जाहीरातही करत नाही. पण, रोनाल्डोच्या या कृतीनं पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांच्यासह सर्वांच आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावरही रोनाल्डोचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरुन, अनेकांनी मिम्सही बनवले आहेत. आता, असाच एक मजेशीर व्हायरल झाला आहे.
रोनाल्डोने हटविलेल्या कोकच्या बाटल्या एका व्यक्तीला मिळाल्या आहेत. म्हणजे हा मजेशीर व्हिडिओ एका नेटीझन्सने बनवला आहे. हा व्हिडिओ स्पोर्ट्समन हेमंत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, या व्हिडिओसह Brilliant असे कॅप्शनही दिलंय. आता, तुम्हीच पाहा हा भन्नाट व्हिडिओ
कोका कोला कंपनीला 4 बिलियन्सचा फटका
आता रोनाल्डोनं Coca Cola च्या दोन बॉटल्स हलवल्या अन् दुसरीकडे शेअर बाजारही गडगडला. रोनाल्डोच्या त्या कृतीनं Coca Colaचे स्टॉक्स 1.6% टक्क्यांनी कोसळून ते 242 बिलियन अमेरिकन डॉलरवरून 238 बिलियन अमेरिकन डॉलरवर आले. कोका कोला कंपनीला 4 बिलियन अमेरिकन डॉलरचा फटका बसला... भारतीय रक्कमेत सांगायचे तर हे नुकसान 2,93,27,80,00,000 इतके मोठे आहे.