कोरोना व्हायरसमुळे चीनबद्दल जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. पण, त्याचा राग भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टावर ( Jwala Gutta) काढला गेल्याच्या अनेक घटना घडल्या. भारताची दुहेरीतील स्टार खेळाडू ज्वालानंही तिच्या स्वभावानुरूप नेटिझन्सना सडेतोड उत्तर दिले. पण, आता ट्रोलर्सनी हद्दच केली. ज्वाला गुट्टानं तिच्या आजीच्या निधनाची ( grand mom who passed away) बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली. पण, तिला काही नेटिझन्सनी ट्रोल केलं आणि त्यावर ज्वालानं सहानुभूती कुठेय? असा सवाल विचारत राग व्यक्त केला. चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार
ज्वालानं ट्विट केलं की,''माझ्या आजीचं चीनमध्ये निधन झालं. माझी आई प्रत्येक महिन्याला तिला भेटायला जाते, परंतु कोव्हिडमुळे गेले वर्षभर तिला जाता आलं नाही. आपल्या जवळच्या व्यक्तिंसोबत घालवलेला वर्तमान किती महत्त्वाचे आहे, हे या कोव्हिडनं आपल्याला शिकवलं.'' हरणार नाही, लढणार!; ८ वर्ष थांबलो, त्यात आणखी एक वर्ष; एस श्रीसंत प्रचंड नाराज