शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

व्हीलचेअरवरून उठून दीपाची सुवर्णपदकाला गवसणी; जिम्नॅस्टिक्सच्या राणीची फिनिक्सभरारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 6:40 PM

धोका पत्करल्याशिवाय आयुष्यात मोठे यश मिळवता येत नाही, हे तिने कधीकाळी म्हटलेले वाक्य पुन्हा समोर उभे राहिले.

ठळक मुद्देपुनरागमनाने पुन्हा एकदा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

- स्वदेश घाणेकरदोन वर्षांपूर्वी तिने आपल्या कामगिरीने भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला दखल घेण्यास भाग पाडले. अथक परिश्रम,  कणखर मानसिकता, प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पुढे चालत राहण्याचा निर्धार यामुळे ती भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनली. भारतात तिला '' जिम्नॅस्टिक्स राणी'' असे संबोधले जाऊ लागले. पण, 2016मधील यशानंतर ती अचानक नाहीशी झाली. स्वेच्छेने नव्हे तर दुखापतीमुळे तिला खेळापासून दूर व्हावे लागले. अनेक स्पर्धांमधून माघारही घ्यावी लागली. वॉकरच्या साहाय्याने चालावे लागत असल्यामुळे तिची कारकीर्द संपली अशा चर्चा रंगल्या. पण, ती इतक्या सहजासहजी हार मानणारी नव्हती. रविवारी पुन्हा एकदा तिचे नाव ऐकून आनंद झाला. धोका पत्करल्याशिवाय आयुष्यात मोठे यश मिळवता येत नाही, हे तिने कधीकाळी म्हटलेले वाक्य पुन्हा समोर उभे राहिले.त्रिपुरा येथील आगरतळा येथील दीपा कर्माकरने  2014च्या राष्ट्रकुल व 2015 च्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदक पटकावली. त्यावेळी भारताच्या खात्यात अमुक एक खेळाडूने पदक जमा केले, इतकाच तिचा उल्लेख. मात्र 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिने भारतीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दखल घेण्यास भाग पाडले. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने प्रोडुनोव्हा सारख्या आव्हानात्मक जिम्नॅस्टिक प्रकारात सहभाग घेतला. केवळ सहभाग घेऊन ती माघारी परतली नाही, तर अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंना तिने तोडीसतोड खेळ केला. थोड्याश्या गुणांनी तिचे पदक हुकले, पण तिने शंभर कोटीहून अधिक भारतवासीयांची मनं जिंकली. तिच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर जिम्नॅस्टिक हा खेळ घराघरात पोहोचला. पण, दुर्दैवाने आशियाई आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक्स स्पर्धेच्या तयारीदरम्यान तिचा गुडघ्याला दुखापत झाली. गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला ब-याच स्पर्धांतून माघार घ्यावी लागली होती. त्यात 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेचाही समावेश होता. वॉकरच्या साहाय्याने चालणारी दीपा पाहून ती पुनरागमन करेल ही आशाच सोडून दिली होती. पण, आव्हानांसमोर डगमगणारी दीपा नाही, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले. दीपाने तुर्कस्थान येथे सुरु असलेल्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतील दीपाचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.या स्पर्धेत दीपाने प्रोडुनोव्हा या प्रकारात सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे व्हॉल्ट या प्रकारात दीपा कशी कामगिरी करते याकडे साऱ्यांचे लक्ष होते.  अंतिम फेरीत दीपाने 14.150 गुण कमावत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. या सुवर्णकामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या पुनरागमनाने पुन्हा एकदा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडा