टेनिस जगतात अधिराज्य गाजवणारा स्पॅनिशचा स्टार टेनिसपटूराफेल नदाल याने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. डेव्हिस करंडक स्पर्धेनंतर तो पुन्हा कोर्टवर दिसणार नाही. ३८ वर्षीय स्टारनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली. जी त्याच्या अनेक चाहत्यांसाठी मोठा धक्का देणारी होती. २२ वेळा ग्रँडस्लॅम जिंकून या टेनिसपटूनं आपली प्रतिभा दाखवून देत टेनिस जगतात मोठा चाहतावर्ग कमावला आहे. नदालची शैली, खेळातील सर्वोत्तम कौशल्य अनेकांना त्याच्याकडे आकर्षित करणारे ठरले. त्याच कौतुक करणाऱ्या मंडळींच्या यादीत भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीचाही समावेश होतो.
महेंद्रसिंह धोनीही राफेल नदालचा मोठा चाहता
क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडून लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला महेंद्रसिंह धोनी हा टेनिस स्टार राफेल नदालचा मोठा चाहता आहे. २०१७ मध्ये एका कार्यक्रमात धोनीने नदाल हा आवडता खेळाडू असल्याचे म्हटले होते. Tekplay's यूट्यूब चॅनेलवरील खास मुलाखतीमध्ये धोनीनं स्पॅनिश टेनिस स्टारचं खास शब्दांत कौतुक केले होते. तो म्हणाला होता की, दुसऱ्या स्थानावर असलेला खेळाडू मला प्रभावित करतो. मी ही गोष्ट जाणीवपूर्वक करत नाही. माझ्या बाबतीत हे घडते. याआधी मी आंद्रे अगासीला सपोर्ट करायचो त्यावेळी तो दुसऱ्या क्रमांकावर होता. या यादीत स्टेफी ग्राफही आहे. जी दुसऱ्या नंबरवर असायची त्यानंतर या यादीत नदालचा समावेश झाला. जो नंबर वनही ठरला, असे धोनी म्हटले होते.
या टेनिस स्टामध्ये स्टार क्रिकेटनं असं काय पाहिलं? नदालसंदर्भात काय म्हणाला होता धोनी?
"मला वाटते की, तो शेवटच्या पाँइंटपर्यंत जिद्दीने खेळतो. पराभव दिसत असला तरी तो या परिस्थितीतही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. हेच खूप महत्वाचे आहे. सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो सामान सोडत नाही. परिस्थिती कोणतीही असो तो सर्वोत्तम देतो" असे वर्णन करत धोनीने नदालचं कौतुक केलं होते.
टेनिस जगतात खास पराक्रमासह छाप सोडणारा खेळाडू
आपल्या २३ वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीत राफेल नदालनं टेनिस जगतात एक विशेष छाप सोडली आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो नोव्हाक जोकोविच (२४) पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. डोक्यावर पट्टी बांधून कोर्टवर उतरण्याचा त्याचा स्टायलिश अंदाज अन् जिद्दीनं लढण्याची धमक याचे कि